Asian Games 2023 : क्रिकेटने वाढले एशियन गेम्सचे आकर्षण

Asian Games 2023 : क्रिकेटने वाढले एशियन गेम्सचे आकर्षण
Published on
Updated on

हाँगझोऊ, वृत्तसंस्था : एशियन गेम्सला (Asian Games 2023) 23 सप्टेंबरपासून अधिकृतपणे प्रारंभ होणार आहे. परंतु, फुटबॉलचे सामने मंगळवारपासून सुरू झाले. यंदाच्या आशियाई गेम्समध्ये पुरुष क्रिकेट संघांचे सामने हे विशेष आकर्षण असतील. क्रिकेटची स्पर्धा टी-20 प्रकारात खेळवण्यात येणार आहे. महिला पात्रता फेरीच्या क्रिकेटचे सामने सुरू झाले असले, तरी खर्‍या अर्थाने त्यात रंग भरणार आहे तो पुरुष गटाचे सामने सुरू झाल्यापासून. पुरुष संघाचे ग्रुप स्टेज सामने 27 सप्टेेंबरपासून सुरू होतील. 3 ऑक्टोबरपासून बाद फेरीला सुरुवात होईल.

7 ऑक्टोेबरला अंतिम सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेत 15 संघ सहभागी होत आहेत. स्पर्धेत आशियातील चार प्रमुख संघ भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश थेट उपांत्यपूर्व फेरीपासून स्पर्धेत खेळतील. ग्रुप स्टेजमधील चार विजेते संघ या प्रमुख संघाविरुद्ध खेळतील. स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. भारतीय पुरुष संघांत बीसीसीआयने युवा खेळाडूंना संधी दिली आहे. भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड आणि महिला संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे.

महिला संघाचे पात्रता फेरीचे सामने मंगळवारपासून सुरू झाले. भारतीय संघ 21 सप्टेंबरला आपला पहिला सामना खेळणार आहे. भारताचा महिला संघ इंडोनेशिया आणि मंगोलिया यांच्यासमवेत 'ए' ग्रुपमध्ये आहे. स्पर्धेच्या सुवर्णपदकाची लढत 25 सप्टेंबर रोजी होईल.

भारतीय पुरुष संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयसवाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, आकाश दीप, प्रभसिमरन सिंह (विकेटकिपर) आणि शिवम दुबे.

राखीव खेळाडू : यश ठाकूर, साई किशोर, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, साई सुदर्शन.

भारतीय महिला संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकिपर), अमनजोत कौर, देविका वैद्य, तितस साधु, राजेश्वरी गायकवाड़, मिन्नू मणि, कनिका आहुजा, उमा छेत्री (विकेटकिपर), अनुषा बरेड्डी आणि पूजा वस्त्राकर.

राखीव खेळाडू : हरलीन देओल, काशवी गौतम, स्नेह राणा और सायका इशाक.

सामने कोठे पाहता येतील (Asian Games 2023)

एशियन गेम्सचे सर्व सामने सोनी स्पोर्टस् नेटवर्कवर पाहता येतील. भारतीय वेळेनुसार सकाळी 6.30 आणि दुपारी 11.30 वाजता सामने सुरू होणार आहेत.

पदकांचे दावेदार अ‍ॅथलिट ज्योती याराजी (100 मी. हर्डल)

100 मीटर अडथळा शर्यतीत एशियन चॅम्पियन असलेल्या ज्योती याराजीला यंदाच्या एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकण्यात अडथळा येणार नाही, अशी अपेक्षा आहे. तिला चीनच्या वू यान्नी हिच्याकडून टक्कर मिळेल.

पुरुष 4 बाय 400

ऑगस्टमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये क्लासिफिकेशन राऊंडमध्ये 2 मी. 59.05 सेकंदांची वेळ नोंदवणारा भारतीय पुरुष संघ 4 बाय 400 मीटर रिले स्पर्धेत सुवर्णपदक जिंकेल, असा कयास आहे. या भारतीय चौकडीने नोंदवलेला वेळ जगातील आठव्या क्रमांकाची सर्वश्रेष्ठ आहे; परंतु त्याआधी झालेल्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी 3 मी. 01.80 सेकंद वेळ नोंदवली. त्यांना या स्पर्धेत श्रीलंका संघाकडून आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

मिश्र 4 बाय 400

2018 च्या एशियन गेम्सचे सुवर्णपदक जिंकणार्‍या संघाकडून यंदा त्या कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा आहे. या संघाने जुलैमध्ये एशियाई चॅम्पियनशिपमध्ये तीन मिनिटे 14.70 सेकंदांच्या वेळेसह विजय नोंदवला होता. ही आशिया खंडातील सर्वश्रेष्ठ वेळ आहे.

महिला 4 बाय 400

भारताचा महिलांचा 4 बाय 400 मीटर रिले संघ तितकासा मजबूत संघ नाही. त्यांच्या कामगिरीत सातत्य नाही; परंतु एखाद्या स्पर्धेत ते अनपेक्षित बाजी मारून जातात. म्हणून त्यांच्याकडूनही पदकाची अपेक्षा आहे.

तिरंदाजी कम्पाऊंड सांघिक स्पर्धा

ऑगस्ट महिन्यात वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक करणार्‍या भारतीय कम्पाऊंड तिरंदाजी महिला संघ आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेला आहे. याशिवाय ओजस देवताळे आणि आदिती स्वामी यांचा समावेश असलेला मिश्र संघही अंतिम फेरीत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

ज्योती वेन्नाम चार वर्षांपासून जलतरणातील लिम्का बुकमध्ये विक्रम अबाधित राखणारी आणि जागतिक पातळीवरील दुसर्‍या क्रमांकाची तिरंदाज ज्योती वेन्नाम एशियाडमध्ये आपले पहिले व्यक्तिगत सुवर्णपदक जिंकण्यास उत्सुक आहे. गेल्यावर्षी पुनरागमन केल्यापासून ज्योतीने धडाकेबाज कामगिरी केली आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहा सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्यपदके तिने जिंकली आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news