Asia Cup AFG vs PAK : पाकिस्तानच्या असिफ अलीने अफगानिस्तानच्या गोलंदाजावर उगारली बॅट (Video)

 ICC Code of Conduct
ICC Code of Conduct
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक स्पर्धेतील सुपर 4 फेरीत आज (दि. 7) पाकिस्तानने अफगानिस्तानवर १ गडी राखून विजय मिळवला. अटीतटीच्या सामन्यात अफगानिस्तानने शेवटच्या षटकापर्यंत झुंज दिली. शाबाद खान, इफ्तिखार खान यांनी केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर पाकिस्तानने अफगानिस्तानवर १ गडी राखून विजय मिळवला. (Asia Cup AFG vs PAK )

शेवटच्या षटकात नसीम शाहने दोन षटकार लगावत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. (Asia Cup AFG vs PAK ) मात्र, पाकविरूद्ध अफगानिस्तान सामन्यातील अंतिम षटक इतके रोमहर्षक होते की, खेळाडूही आपल्या भावना रोखू शकले नाहीत. सामन्याच्या १९ व्या षटकात असिफ अली बाद झाल्यानंतर अफगानिस्तानचा वेगवान गोलंदाज फरीद अहमद मलिक जल्लोष करू लागला. जल्लोष करताना फरीद मलिक हा असिफ अलीच्या अगदी जवळ येऊन थांबला. असिफ अलीला मात्र याचा राग आला आणि त्याने फरीद मलिकवर बॅट उगारली. काही वेळानंतर या दोन खेळाडूंमधील वाद रोखण्यासाठी पंचांना मध्यस्थी करावी लागली. या दोन खेळाडूंमधील वादामुळे सामन्यादरम्यान वातावरण चांगलेच तापले होते. (Asia Cup AFG vs PAK )

पाकिस्तानने अफगानिस्तानवर विजय मिळवल्यानंतर भारत आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेने आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. नसीम शाहने अंतिम षटकात केलेल्या फटकेबाजीने पाकिस्तानला हा विजय संपादन करता आला. तत्पूर्वी, हरिस रौफने २ तर मोहम्मद नवाज, नसीम शाह, मोहम्मद हसनैन आणि शाबाद खान यांनी प्रत्येकी १ विकेट्स पटकावत अफगानिस्तानला १२९ धावापर्यंत रोखले. (Asia Cup AFG vs PAK )

हरिस रौफने त्याच्या ४ षटकांमध्ये २६ धावा देत दोन विकेट्स पटकावल्या. अटीतटीच्या सामन्यात अफगानिस्तानने पाकिस्तानची भीषण अवस्था केली. शेवटच्या षटकात पाकिस्तानला ११ धावांची गरज होती. पाकिस्तानचा गोलंदाज शाबाद खानने अंतिम षटकात २ षटकार लगावत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. अफगानिस्तानकडून फारिद मलिकने कडवी या गोलंदाजाने कडवी झुंज दिली. त्याने ४ षटकांमध्ये ३१ धावा देत ३ विकेट्स पटकावल्या. (Asia Cup AFG vs PAK )

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news