Asia CUP 2023 Final : श्रीलंकेच्‍या फलंदाजांची दाणादाण, जाणून घ्‍या वन-डेतील निच्‍चांकी धावसंख्‍या

Asia CUP 2023 Final : श्रीलंकेच्‍या फलंदाजांची दाणादाण, जाणून घ्‍या वन-डेतील निच्‍चांकी धावसंख्‍या

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना ( Asia CUP 2023 Final ) आज (दि. १७ सप्‍टेंबर ) भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवण्यात येत आहे. टॉस जिंकत श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र भारतीय वेगवान गाेलंदाज माेहम्‍मद सिराज, बुमराह आणि हार्दिक पंड्याच्‍या भेदक मार्‍याने श्रीलंकेच्‍या फलंदाजांची दुर्दशा झाली. सिराजने २१ धावा देत  सहा विकेट घेतल्या.  पंडयाने दाेन तर बुमराहने एक बळी घेतला.(IND vs SL Asia Cup Final) जाणून घेवूया वन-डे  सामन्‍यातील आजवरच्‍या  निच्‍चांकी धावसंख्‍याविषयी…

Asia CUP 2023 Final : श्रीलंकेची वन-डेतील भारताविरुद्धची निच्‍चांकी धावसंख्‍या

श्रीलंकेचा वन-डेमधील सर्वात निच्‍चांकी धावसंख्‍या ४३ आहे. दक्षिण आफ्रिका संघाने ४३ धावांमध्‍ये लंकेचा संघ गुंडाळला होता. दुसर्‍या क्रमाकांची निच्‍चांकी धावसंख्‍या वेस्‍ट इंडियजविरद्‍ध ५५ धावा होती. तर इंग्‍लंडच्‍या संघ्‍याने ६७ धावांमध्‍ये लंकेला रोखले होते. श्रीलंका संघाची चौथ्‍या क्रमाकांची निच्‍चांकी धावसंख्‍या ७३ ही भारताविरोधातच होती. आता आशिया चषक 2023 स्पर्धेच्‍या अंतिम सामन्‍यात श्रीलंकेची एकुण तिसरी अणि भारताविरुद्ध निच्‍चांकी धावसंख्‍या ठरली आहे.

वन-डे क्रिकटमधील निच्‍चांकी धावसंख्‍या

1) झिम्बाब्वे – 2004 : श्रीलंकेविरुद्ध 18 षटकांत 35 धावा.
2) अमेरिका – 2020 :  नेपाळविरुद्ध 12 षटकांत 35 धावा
3) कॅनडा – 2003  :  श्रीलंकेविरुद्ध 18.4 षटकांत 36 धावा.
4) झिम्बाब्वे – 2001 : श्रीलंकेविरुद्ध 15.4 षटकात 38 धावा.
6) पाकिस्तान – 1993 :  वेस्ट इंडिजविरुद्ध 19.5 षटकात 43 धावा.
5) श्रीलंका – 2012:  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 20.1 षटकात 43 धावा.
7) झिम्बाब्वे – 2009 : बांगलादेशविरुद्ध 24.5 षटकात 44 धावा.
8) कॅनडा – 1979 :  इंग्लंडविरुद्ध 40.3 षटकांत 45 धावा.
9) नामिबिया – 2003 :  ऑस्ट्रेलियाविरुद्ध 14 षटकांत 45 धावा.
10) श्रीलंका –  2023 : भारताविरुद्ध 15.2 षटकांत 50 धावा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news