Asia Cup Mystery Girl : आशिया कप फायनलनंतर व्हायरल होणारी ‘ही’ मिस्ट्री गर्ल कोण आहे? (Video)

Asia Cup Mystery Girl : आशिया कप फायनलनंतर व्हायरल होणारी ‘ही’ मिस्ट्री गर्ल कोण आहे? (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asia Cup Mystery Girl : आशिया कप स्पर्धा संपून दोन दिवस झाले आहेत. यंदा श्रीलंका संघाने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. भारताला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. अंतिम सामन्यात संघ खेळत नसल्याचे पाहून भारतीय चाहत्यांचा या सामन्यात रस कमी झाला. असे असतानाही भारतीय चाहत्यांनी हा सामना पाहिला आणि श्रीलंकेच्या संघाने आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली. त्याचवेळी हा सामना संपल्यानंतर या सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका मिस्ट्री गर्लचा आहे.

आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला 23 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. रविवारी (दि. 11) खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एका मिस्ट्री गर्लची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. ही मिस्ट्री गर्ल कोण आहे आणि कोणत्या संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती हे अद्याप समजू शकलेले नाही. या मिस्ट्री गर्लला पाहिल्यानंतर चाहत्यांकडून सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. तिच्याविषयी सोशल मीडियावर सध्या जोरात चर्चा सुरू आहे. एका चाहत्याने तर, अंतिम सामना पूर्ण पाहण्याचे हे एकमेव कारण आहे, असे म्हटले आहे. व्हायरल होत असलेली ही व्हिडिओ क्लिप ज्यावेळेची आहे, त्यावेळी श्रीलंकेची फकंदाजी सुरू होती. आणि त्यावेळी श्रीलंकेची धावसंख्या तीन बाद 40 होती. (Asia Cup Mystery Girl)

या महिला चाहतीच्या रिॲक़्शन इतक्या क्यूट होत्या की तिची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केली आहे. क्रिकेटच्या इतिहासात अनेक मिस्ट्री गर्ल्स पाहिल्या गेल्या आहेत. आयपीएल असो की आशिया कप, मॅचमधील अनेक मिस्ट्री गर्ल्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नुकताच आशिया कप संपल्यानंतर सोशल मीडियावर आणखी एका मिस्ट्री गर्लच्या रिॲक़्शनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. वास्तविक, श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी खूप लोक आले होते. (Asia Cup Mystery Girl)

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर एक वेळ अशी होती की श्रीलंकेने 58 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. झटपट विकेट गमावल्यानंतरही श्रीलंकन फलंदाजांनी हार मानली नाही. त्यांच्या राजपाक्षे आणि हसरंगा या फलंदाजांनी संघचा डाव सावरून आश्वासक धावसंख्येपर्यंत मजल मारली. श्रीलंकेच्या या कमबॅकमुळेच पाकिस्तानचा ख-या अर्थाने बँड वाजला. श्रीलंकेने निर्धारित 20 षटकात 170 धावा केल्या, प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 20 षटकात 147 धावांवर ऑलआऊट झाला. वनिंदू हसरंगा याला मालिकावीर, तर भानुका राजपाक्षेला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. (Asia Cup Mystery Girl)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news