कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यातील अश्विन- मॉर्गन वाद चांगलाच चर्चेचा विषय ठरला. अश्विन फलंदाजीवेळी केकेआरचा कर्णधार इऑन मॉर्गन याच्या अंगावर धावून जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यावेळी अश्विनची टीम साऊदीबरोबरही शाब्दिक वादावादी झाल्याचे समोर आले होते.
अश्विन- मॉर्गन वाद झाल्यानंतर अश्विनने मॉर्गनला शुन्यावर बाद करत एक प्रकारे बदलाच घेतला. मात्र एवढे करुनही केकेआरने दिल्लीवर ३ विकेट्सनी मात केली. दरम्यान, अश्विन- मॉर्गन वाद झाला त्यावेळी मध्यस्थी करुन अश्विनला बाजूला घेणाऱ्या विकेटकिपर दिनेश कार्तिकने घडलेल्या घटनाक्रमाबद्दल माहिती दिली.
विजयानंतर कार्तिक म्हणाला, 'मला माहित होते की ज्यावेळी राहुल त्रिपाठीने थ्रो केला त्यावेळी तो ऋषभ पंतच्या शरिराला लागून बाजूला गेला. त्यावेळी अश्विनने एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता.' तो पुढे म्हणाला की, 'मला वाटते की मॉर्गनला हीच गोष्ट आवडली नाही. त्याला आशा होती की ज्यावेळी चेंडू फलंदाजाला लागून बाजूला जातो त्यावेळी फलंदाज खिलाडू वृत्तीने त्याच्यावर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करणार नाही. हा खूपच रंजक विषय आहे. यावर माझे असे एक वैयक्तीक मत आहे. मात्र आता मी एवढेच म्हणू शकतो की मी अश्विन- मॉर्गन वाद शांत करण्याची भुमिका बजावली याचा मला आनंद आहे. त्यानंतर सर्व गोष्टी सुरळीत झाल्या.'
दुसऱ्या बाजूला कर्णधार ऋषभ पंतने या प्रकरणाला फारशी किंमत दिली नाही. हा खेळाचाच एक भाग असल्याचे त्याने म्हटले.
तो आपल्या वक्तव्यात म्हणाला, 'मला असे वाटते की हा खेळाचच एक भाग आहे. दोन्ही संघ विजयासाठी खेळत असताना असे होणे स्वाभाविक आहे. मला असे वाटते की जे खेळासाठी चांगले आहे ते खिलाडूवृत्तीत मोडते. मला वाटते की कोणीही या प्रकाराच्या वादाला जास्त महत्व देऊ नये. शेवटी अश्विन आणि मॉर्गन दोन्हीही आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठीच खेळत होते. त्यांच्यात काही विसंवाद झाला.'
पंतने पृथ्वी शॉच्या फिटनेसबाबतही माहिती दिली. त्याने शॉ जवळपास ८० टक्के फिट झाला आहे. त्यामुळे तो पुढच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे असे सांगितले.
[box type="shadow" align="" class="" width=""][visual_portfolio id="40771"][/box]