Ashish Shelar : आमच्या कमळाला ‘बाई’ म्हणता, तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला ‘पेंग्विन सेना’ म्हणायचे का?, आशिष शेलारांचा ठाकरेंना सवाल

Ashish Shelar : आमच्या कमळाला ‘बाई’ म्हणता, तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला ‘पेंग्विन सेना’ म्हणायचे का?, आशिष शेलारांचा ठाकरेंना सवाल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : आमच्या कमळाला तुम्ही बाई म्हणून हिणवत असाल तर आम्ही तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला आता काय 'पेंग्विन सेना' म्हणायचे का? असा पलटवार भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. आशिष शेलारांनी उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. त्यातून त्यांनी ठाकरेंना सवाल केला आहे. हे पत्र आशिष शेलारांनी ट्विट केले आहे. सामनातून कमळाबाई असा उल्लेख केल्याने आशिष शेलार चांगलेच संतापलेले दिसत आहेत.

आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये तुम्ही सामनातून आमच्या पक्षाच्या कमळ या चिन्हाला बाई म्हणून हिणवता, काही हरकत नाही. पण याच बाईमध्ये एक आई, ताई आणि वेळप्रसंगी कडक लक्ष्मीही असते हे विसरू नका. हे कृपया लक्षात असू द्या, असेही शेलारांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news