व्लादिमीर पुतीन यांनी घोषणा करताच रशियन नागरिक देश सोडण्याच्या तयारीत

व्लादिमीर पुतीन यांनी घोषणा करताच रशियन नागरिक देश सोडण्याच्या तयारीत

पुढारी ऑनलाईन : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी एक घोषणा केली अन् यानंतर अवघ्या रशियात खळबळ उडाली आहे. पुतीन यांनी केलेल्या घोषणेचे पडसाद इतके तीव्र आहेत की, रशियातील नागरिक हे देश सोडून जाण्याच्या तयारीला लागलेत. यानंतर विमानाच्या तिकीट बुकिंगमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामधील हजारो नागरिकांनी वन-वे विमानाची तिकिटं बुक केली आहेत. याचा परिणाम असा झाला आहे की, विमान तिकीट दरदेखील अवाच्या सव्वा झाले आहेत.

आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, इतका मोठा परिणाम होणारी अशी कोणती घोषणा रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी केली. गेल्या सात महिन्यांहून अधिक काळ रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पुतीन यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्यामुळे संपूर्ण युरोप ढवळून निघाला आहे. पुतीन यांनी युक्रेनचे चार भूभाग म्हणजेच यूक्रेनचा २० टक्के प्रदेश रशियाला जोडण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. यासोबत रशियाच्या सैन्यात ३ लाख राखीव सैन्य भरतीचे आदेश दिले आहेत.

रशियाच्या सार्वभौमत्त्वाला धोका निर्माण करणाऱ्यांना आमच्याकडे असलेली सर्व ताकद वापरून प्रत्युत्तर देवू, असा थेट इशारा देखील पुतीन यांनी पाश्चिमात्य देशांना दिला आहे. या पार्शवभूमीवर पुतीन आणखी एखादी मोठी घोषणा करू शकतात, की ज्यामुळे युद्धाला तोंड फुटू शकते. ज्यामुळे रशियाच्या सीमा बंद होऊ शकतात. नागरिकांना देश सोडून बाहेर जाता येणार नाही. याच भितीने रशियन नागरिक आपला राहता देश सोडत आहेत. पुतीन यांनी केलेल्या या घोषणांमुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळेच येथील नागरिक भितीने देश सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीने रशियात खळबळ उडाली आहे. पुतीन यांच्या घोषणेनंतर रशियात काही ठिकाणी आंदोलनंही उभारली जात आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news