मुख्यमंत्री म्हणून आता नाना पटोले समर्थकांचीही बॅनरबाजी

मुख्यमंत्री म्हणून आता नाना पटोले समर्थकांचीही बॅनरबाजी
Published on
Updated on
नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील अनेक नेत्यांनी आजवर राज्याचे मुख्यमंत्री होण्याची आपली इच्छा बोलून दाखविली आहे. तर काही नेत्यांच्या समर्थकांनी भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे मार्केटींग चालवले आहे. या नेत्यांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची देखील आता उघडपणे भर पडली आहे. नाना पटोलेंचा उद्या सोमवारी वाढदिवस असल्याच्या निमित्ताने त्यांच्या नागपुरातील समर्थकांनी हे पोस्टर लावले असून त्यावर पटोलेंचा 'भावी मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
मविआत लहान मोठा भाऊ वाद सुरू असताना, प्रदेशाध्यक्ष बदलासाठी विरोधक दिल्ली दरबारी गेल्यानंतरही नाना समर्थकांचे हे बॅनर म्हणजे त्यांना तूर्तास अभयदान मिळाले असल्याचेच द्योतक म्हणता येईल. काही वर्षांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे सांगत खळबळ उडविली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, आदित्य ठाकरेंसह अनेकांचा त्यांचा उल्लेख त्यांच्या समर्थकांकडून भावी मुख्यमंत्री असा केला जाऊ लागला. आता त्यात नाना पटोले यांची भर पडली आहे. 5 जून रोजी पटोले यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने नागपुरातील अजनी परिसरात समर्थकांनी त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून हे लक्षवेधी पोस्टर लावलेले आहेत. देवेंद्र फडणवीस, अजितदादांनी समर्थकांना समज दिली तशी अजूनतरी नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना समज दिलेली नाही.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news