तेर; पुढारी वृत्तसेवा : यावर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना तोट्याचाच ठरला कमी पाऊस व किडींच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. खरीप हंगाम नुकसानकारक ठरल्यानंतर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामावर भर दिला. हरभरासह ज्वारी मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली. मात्र ज्वारी बाजारात येताच भाव गडगडले व्यापारी हमीभावापेक्षाही कमी दराने खरेदी घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना डोक्यावर हाथ मारण्याची वेळ आली.
मागील दोन दशकांत ज्वारीच्या बाजारभावाची तुलना केली तर ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणि बाजारभावाचा ताळमेळ जुळत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारी पिकाकडे पाठ फिरवली सन 2014-15 मध्ये केंद्र शासनाने ज्वारीचा हमीभाव 1550 रुपये प्रती क्विंटल जाहीर केला होता. तब्बल 9 वर्षानी 2023-24 मध्ये हा भाव 3225 रुपये क्विंटल जाहीर केला.शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च व मिळणारा भाव याचा कुठेच ताळमेळ बसत नाही.
मागील वर्ष २०२३ हे जागतिक भरडधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. भरडधान्यांमध्ये ज्वारी हे महत्त्वाचं पीक आहे. पण मागील काही वर्षांत ज्वारीचे क्षेत्र मोठ्याप्रमाणावर घसरले आहे.
विशेष म्हणजे हा दर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीच्याही खाली भाव होता. ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणि बाजारभावाचा ताळमेळ जुळत नाही. त्यामुळे ज्वारीचा कायम दबावात राहणारा बाजारभाव परवडत नाही, असं शेतकरी सांगतात. उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने ज्वारी आतबट्ट्याची ठरत असल्याने कमी प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरलैली ज्वारी खाण्यासाठी म्हणून उपयोगात आणली जाते .आता रब्बीची ज्वारी खुल्या बाजारात विक्रीसाठी येताच गेल्या महिन्यात 4000 रुपये प्रती क्विंटल असणारा भाव ज्वारी खुल्या बाजारात येताच 2300 पासून 3000 रूपयापर्यंत खाली आला आहे.
रासायनिक खत, मशागत, याचा व मिळणाऱ्या भावाचा ताळमेळ लागत नाही.हमीभावापेक्षा कमी साधारण भाव मिळत आहे.पशूची संख्या कमी असलीतरी जनावरांच्या चाऱ्याचा भावही गेल्या दोन महिन्याच्या तुलनेत प्रती शेकडा 2000 रू असणारा भाव 1200 रूपयापर्यंत घसरला आहे. एकंदरीत यंदाचा खरीप व रब्बी हंगाम शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडविणारा ठरला आहे.
हेही वाचा