दिवाळी संपताच ठाणे जिल्ह्यात भात कापणीला सुरूवात

भात कापणी
भात कापणी

नवी मुंबई; पुढारी वृतसेवा ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यात भात लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. अतिवृष्टीमुळे काही तालुक्यातील भात पिकांचे नुकसानही झाले आहे. शेतक-यांच्या तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला. मात्र असे असले तरी शेतक-यांनी आता दिवाळी संपताच भात कापणीला सुरूवात केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे ग्रामीण, कल्याण, भिवंडी, शहापूर, वाडा, पालघर जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यातील घोटी, इगतपुरी तालुक्यात भात कापणीला शेतक-यांनी सुरूवात केली आहे. भात कापणीसाठी एका दिवसाला एका मजुरीला साडेचारशे रूपये मजुरी दिली जाते. आठ ते दहा मजुरांच्या गटाने कापणी केली जाते. भात कापणी झाल्यानंतर ते शेतात पसरवून सुकवले जातो. नंतर त्याचे मोठे पाच ते दहा असे गरे घातले जातात.

कापणीच्या तीन आठवड्यानंतर भाताच्या झोडणी करतात. झोडणी केलेला भात हा गिरणीमध्ये पॉलीश केला जातो. मात्र काही शेतकरी हे पॉलीश करत नाही. पॉलीश केल्याने तांदळातील सत्व कमी होतो असा समज आहे. हाच भात शेतकरी आपल्या घरात भरून वर्षभर वापरतो. अनेक ग्राहक, व्यापारी हे इगतपुरी आणि घोटी येथील राईस मिलमधून पॉलीश केलेला तांदूळ खरेदी करतात. त्यामध्ये सुरती कोलम, वाडा कोलम, झिनी, चिन्नोर, आंबे मोहर, इंद्रायणी या जातीच्या वाणांचा समावेश असतो.

विशेष म्हणजे भाताच्या पेंढालाही विशेष महत्त्व आहे. हा पेंढा कोकण हापूस आंबा फिकवण्यासाठी वापरतात. यासाठी पेंढा व्यापा-यांमार्फत मुंबई एपीएमसी येथील व्यापारी हे पेंढा खरेदी करतात. याच पेंढामध्ये हापूस आंबा पिकतो आणि टिकतो. याला ही चार महिने चांगला बाजार असतो.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news