काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी अरविंद शिंदे यांची निवड; 30 वर्षानंतर मराठा समाजाला संधी

काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी अरविंद शिंदे यांची निवड; 30 वर्षानंतर मराठा समाजाला संधी

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी जेष्ठ नेते आणि माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. रमेश बागवे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच शिंदे यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आले असून, आता महापालिका निवडणूका त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत.

काँग्रेसने पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या पदाधिकार्‍यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जवळपास सहा वर्ष पदावर असलेल्या बागवे यांनी दोन दिवसांपुर्वी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मंगळवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अरविंद शिंदे यांच्या अध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब केले. शिंदे यांनी महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता आणि काँग्रेस गटनेता अशा पदांवर काम केले आहे. शिंदे यांच्या निवडीने जवळपास 30 वर्षानंतर मराठा समाजाला शहराध्यपदावर संधी मिळाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news