Arvind Kejriwal : केजरीवालांचा तुरुंगात ‘छळ’ केला जातोय; आप नेते संजय सिंह यांचा दावा

Arvind Kejriwal : केजरीवालांचा तुरुंगात ‘छळ’ केला जातोय; आप नेते संजय सिंह यांचा दावा
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा तिहार तुरुंगात छळ होत आहे तसेच केजरीवाल यांना त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आणि आई-वडिलांना समोरासमोर भेटू दिले जात नसल्याचा दावा आपचे नेते संजय सिंह यांनी केला आहे. अरविंद केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या जामीनासंदर्भातील याचिकेवर न्यायालयात येत्या सोमवारी (१५ एप्रिल) सुनावणी होणार आहे. Arvind Kejriwal
दिल्ली मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना २१ मार्चला ईडीने अटक केली होती. केजरीवाल यांच्या अटकेविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, तिथे ती फेटाळण्यात आली. त्यानंतर केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि तातडीच्या सुनावणीसाठी विनंती केली. मात्र न्यायालयांच्या सुट्टयांमुळे याचिकेवर सुनावणी झाली नव्हती. Arvind Kejriwal
दरम्यान, आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी दावा केला आहे की, अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगात छळ होत आहे. दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात १५ एप्रिलला सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. आपचे नेते केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Arvind Kejriwal : काय म्हणाले संजय सिंह?

शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना संजय सिंह म्हणाले की, "दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर केंद्र सरकारच्या आदेशानुसार तिहार तुरुंगात छळ होत आहे. केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांना प्रत्यक्ष भेटण्यासही नकार दिल्याचेही संजय सिंह म्हणाले. तिहार तुरुंग प्रशासनाने केजरीवाल यांना केंद्र सरकारच्या सांगण्यावरून चुकीची वागणूक दिल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर निशाणा साधला. तुरुंगात केजरीवाल यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तिहार तुरुंगाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे होत असेल असेल. तुरुंगाच्या नियमानुसार, कोणीही तुरुंगात समोरासमोर भेटू शकतो, मात्र अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीला समोरासमोर भेटू दिले जात नाही,  त्यांचे आजारी असलेले आई-वडील त्यांना तुरुंगात भेटायला आले असताना, त्यांना समोरासमोर भेटता येणार नसल्याचे सांगण्यात आले," असेही केजरीवाल म्हणाले.
हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news