केजरीवालांची ‘शुगर लेव्‍हल’ वाढली, तुरुंगात दिले गेले इन्सुलिन

अरविंद केजरीवाल (संग्रहित छायाचित्र)
अरविंद केजरीवाल (संग्रहित छायाचित्र)

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : रक्‍तातील साखरेचे प्रमाण ( शुगर लेव्‍हल) वाढल्‍याने दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंग प्रशासनाने इन्सुलिन दिले. दिल्ली दारू धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 21 मार्च रोजी सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर केजरीवाल यांना दिलेला हा पहिला इन्सुलिनचा डोस होता, असे वृत्त 'इंडिया टूडे'ने दिले आहे.

अरविंद केजरीवाल हे टाइप-2 मधुमेहाचे रुग्ण आहेत. त्यांची शुगर लेव्‍हल ३२० वर गेली होती. त्यांना तिहार तुरुंगात इन्सुलिन देण्यात आले, अशी माहिती आम आदमी पक्षाच्या (आप) सूत्रांनी आज (दि.२३) दिली. केजरीवाल हे सध्या 23 एप्रिलपर्यंत तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. एम्सच्या डॉक्टरांनी तुरुंग प्रशासनाला आवश्यक असल्यास डोस देण्याचा सल्ला दिल्यानंतर सोमवारी संध्याकाळी केजरीवाल यांना इंसुलिन देण्यात आले.

तुरुंगात नसताना केजरीवाल हे दररोज ५० युनिट इन्सुलिन घेत असत. याआधी सोमवारी केजरीवाल यांनी तिहारच्या अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, त्यांच्या ग्लुकोज मीटरचे रीडिंग 250 ते 320 च्या दरम्यान "धोकादायक" श्रेणी आहे. त्‍यामुळे मी इन्सुलिनची विनंती करत आहेत."राजकीय दबावापोटी" कारागृह प्रशासन आपल्या प्रकृतीबाबत खोटे बोलत असल्याचा दावाही त्‍यांनी केला आहे.

अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी त्यांची पत्नी सुनीता यांचीही तुरुंगाच्या आवारात भेट घेतली. 20 एप्रिल रोजी, AIIMS च्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली होती. त्‍यांच्‍या आरोग्याची कोणतीही गंभीर चिंता नसल्याचे स्‍पष्‍ट केले होते. निर्धारित औषधे घेणे सुरू ठेवण्याचा त्‍यांना सल्ला देण्यात आला होता, असे तुरुंगातील सूत्रांनी स्‍पष्‍ट केले आहे.

केजरीवाल जाणीवपूर्वक गाेड खातायत : 'ईडी'

आपने तिहार तुरुंग प्रशासनावर केजरीवालांना इन्सुलिन नाकारून त्‍यांचया "हत्येचा कट" रचल्याचा आरोप केला होता. जरीवाल आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढवण्यासाठी आणि वैद्यकीय जामीनासाठी एक आधार तयार करण्याच्या प्रयत्नात केजरीवाल दररोज आंबे, आलू पुरी आणि मिठाई खात असल्याचा आरोप ईडीने मागील आठवड्यात केल्यानंतर इन्सुलिनचा वाद आणखी वाढला होता. त्याच्या वकिलाने आरोपांचा प्रतिवाद केला की त्याने तुरुंगात फक्त तीनदा आंबे घेतले आणि नवरात्राचा प्रसाद म्हणून आलू पुरी खाल्ली होती.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news