Arun Gandhi : महात्मा गांधी यांचे नातू ‘अरुण’ यांच्या पुस्तकांचा अनुवाद ‘कोल्हापुरा’तील ‘या’ प्रसिद्ध लेखिकेकडून…

Arun Gandhi : महात्मा गांधी यांचे नातू ‘अरुण’ यांच्या पुस्तकांचा अनुवाद ‘कोल्हापुरा’तील ‘या’ प्रसिद्ध लेखिकेकडून…

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू आणि लेखक अरुण गांधी यांचे आज (दि.०२) कोल्हापुरात निधन झाले. त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचे संबंध होते. याच नात्याने ते गेले दोन महिन्यापासून कोल्हापुरात वास्तव्यास होते. दरम्यान अरुण गांधी (Arun Gandhi) यांच्या दोन पुस्तकांचे अनुवाद देखील कोल्हापुरातील प्रसिद्ध लेखिका आणि अनुवादक सोनाली नवांगुळ यांनी केले आहे.

अरुण गांधी यांच्या 'Legacy of Love'(अनुवाद – वारसा प्रेमाचा) आणि 'Gift of Anger'(अनुवाद – वरदान रागाचे) या दोन्ही इंग्रजी पुस्तकांचा मराठी अनुवाद करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या प्रसिद्ध लेखिका, अनुवादक सोनाली नवांगुळ यांनी अरूण गांधी यांच्या दोन्ही पुस्तकांचा अनुवाद केला आहे. त्या मुळच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील असून, गेल्या कित्येक वर्षांपासून कोल्हापुरात त्या वास्तव्यास आहेत. नवांगुळ यांनी अनुवादित केलेली दोन्ही पुस्तके गेल्यावर्षी साधना प्रकाशनाकडून प्रकाशित करण्यात आली आहेत. प्रथम 'वारसा प्रेमाचा' आणि त्याच्या उत्तरार्धात 'वरदान रागाचे' या पुस्तकांचे प्रकाशन (Arun Gandhi) करण्यात आले.

'Legacy of Love'(अनुवाद – वारसा प्रेमाचा)
'Legacy of Love'(अनुवाद – वारसा प्रेमाचा)
'Gift of Anger'(अनुवाद – वरदान रागाचे)
'Gift of Anger'(अनुवाद – वरदान रागाचे)

Arun Gandhi: 'शांती पेरणारा शेतकरी'

महात्मा गांधी यांचे सर्वांत ज्येष्ठ नातू अरुण गांधी हे (मणिलाल यांचे चिरंजीव आणि तुषार यांचे वडील) वयाच्या ८८ व्या वर्षीही समाजकार्यात सक्रिय होते. त्यांचे बालपण व तारुण्य दक्षिण आफ्रिकेत तर नंतरचे आयुष्य भारतातील इंग्रजी पत्रकारितेत गेले. निवृत्तीनंतर ते अमेरिकेत वास्तव्य करीत होते. वय वर्षे 11 ते 13 या काळात अरूण गांधी आजोबांच्या म्हणजेच महात्मा गांधी यांच्या सहवासात राहिले. त्याचा प्रभाव अरुण गांधी यांच्या विचारांवर व कार्यावर (Arun Gandhi) राहिला आहे. ते स्वतःला शांती पेरणारा शेतकरी (Peace Farmer) असे संबोधतात.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news