Viksit Bharat Sankalp : कलावंत बनणार पंतप्रधान मोदींच्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे दूत

Viksit Bharat Sankalp : कलावंत बनणार पंतप्रधान मोदींच्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे दूत

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) वतीने बुधवारी एका अनौपचारिक संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रातील नामवंत १५ कलावंत यात सहभागी झाले. यात सहभागी कलाकारांनी पंतप्रधानांसोबत विकसित भारताचे दूत होण्याची शपथ घेतली. स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षात भारताला विकसित राष्ट्र बनवणे, ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची संकल्पना आहे. त्यांच्या या संकल्पनेनुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. Viksit Bharat Sankalp

आयसीसीआरच्या वतीने आयोजित या संवाद सत्रात संगीत, नृत्य आणि कला क्षेत्रातील १५ नामवंत कलावंत सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान, 'विकसित भारत राजदूत मोहिमेवर' एक सादरीकरण करण्यात आले, यामध्ये या मोहिमेची माहिती देण्यात आली. आयसीसीआरच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, महासंचालक कुमार तुहीन हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. Viksit Bharat Sankalp

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारतदूत मोहिमेचा भाग म्हणून १०० दिवसांचे आव्हान स्वीकारण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. देशाच्या सामूहिक शक्तीचा उपयोग करणे, विकासाचा प्रचार करणे आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी ताकद देणे. हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने 'विकसित भारत संकल्प यात्रा' हा देशव्यापी कार्यक्रम राबवण्यात येत आहे.

Viksit Bharat Sankalp : कोणकोणते कलाकार उपस्थित ?

नृत्यांगणा पद्मभुषण सोनल मानसिंग, सरोद वादक पद्मश्री गुलफाम अहमद, नृत्यांगणा शोवाना नारायण, भारती शिवाजी, प्रतिभा प्रल्हाद, अभिमन्यू लाल, रमा वैद्यनाथन, उमा शर्मा, कौशल्या रेड्डी, जयराम राव आणि वनश्री राव, रेखा मेहरा, शालिना चतुर्वेदी, जयाप्रभा मेनन, अभिनेत्री नलिनी, कामिलीनी, संतुर वादक अभय लाल सपोरी हे कलाकार उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला दिशा देत आहेत. १४० कोटी भारतीयांच्या विकासासाठी ते परिश्रम घेत आहेत. त्यांच्यासोबत या उपक्रमात सहभाग नोंदवून आनंद वाटतो. या उपक्रमाच्या माध्यमातून देश कार्याचाही एक भाग आहोत, याचाही मनस्वी आनंद आहे.

– गुलफाम अहमद, सरोद वादक

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news