वॉशिंग्टन : अमेरिकेचा आगामी अध्यक्ष निश्चित करण्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा वाटा असेल, अशी चिन्हे आता दिसू लागली आहेत.
जसे की, अमेरिकेसाठी 31 मार्च 2023 हा दिवस खूपच महत्त्वाचा ठरला. कारण, यादिवशी दोन गोष्टी घडल्या होत्या. एक म्हणजे न्यायमूर्तींनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावरील आरोपांची निश्चिती केली होती. दुसर्या बाजूला राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस व्हाईट हाऊसमध्ये पार्टी करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. हा व्हिडीओ बारकाईने पाहिला तर समजेल की, कमला हॅरिस यांच्या हाताला सहा बाटे आहेत आणि तळहाताचा वरचा भाग गायब आहे. खरे तर त्या दिवशी बायडेन आणि हॅरिस यापैकी कोणीही व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित नव्हते. तथापि, त्यांचा हा फेक व्हीडीओ लाखो लोकांना पाठवण्यात आला होता. हा व्हिडीओ तयार करण्यात आला होता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने. याला 'एआय' असे म्हटले जाते.
आता आगामी निवडणुकांमध्ये लाखो मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी या तंत्राचा प्रभावीपणे वापर करण्यात येईल, असे चित्र सध्या दिसू लागले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून तयार केलेल्या गोष्टी मतदारांच्या लहान-लहान गटांना त्यांच्या प्रोफाईलनुसार पाठवल्या जातील. हे व्हिडीओ तयार करणारे जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅट-जीपीटी आज सर्वांना माहीत झाले आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये त्याचे लाँचिंग झाले.
चॅट-जीपीटीचे काम काय? तर, इंटरनेटवरून सर्व माहिती शोधून यावर ब्लॉग लिहिणे. त्याद्वारे गाणी आणि कविताही लिहिता येतात. मात्र, या तंत्राच्या माध्यमातून सुरू असलेला प्रचार खरा की खोटा, असा प्रश्न नजीकच्या काळात मतदारांसमोर उभा राहणार आहे.
अमेरिकेत गेल्या निवडणुकीच्या वेळी प्रचारात मोठ्या प्रमाणावर खोटी माहिती पसरवण्यात आली होती. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांचे बनावट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळेच आता खरे काय नि खोटे काय, असा संभ्रम निर्माण झाला, तर सगळी व्यवस्थाच गोत्यात येऊ शकते.
हेही वाचा :