Article-370 : यामी गौतमचा आर्टिकल ३७० ‘या’ राज्यात टॅक्स फ्री

Article-370
Article-370

पुढारी ऑनलाईन डेस्क : यामी गौतम आणि प्रियामणिचा चित्रपट 'आर्टिकल-३७०' हा २३ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात रिलीज झाला होता. या चित्रपट एक पॉलिटिकल ड्रामा आहे. आता 'आर्टिकल-३७०' मध्य प्रदेशमध्ये टॅक्स फ्री करण्यात आले आहे. (Article-370) मुख्यमंत्री मोहन यादव यांनी यामी गौतम-प्रियामणि स्टारर पॉलिटिकल ड्रामा चित्रपट मध्य प्रदेशमध्ये टॅक्स फ्री झाल्याची माहिती आपल्या अधिकृत एक्स अकाऊंट (Twitter) वर लोकांसोबत शेअर केली. त्यांनी आर्टिकल-३७० टॅक्स फ्री करण्याचे कारणही सांगितले. (Article-370)

मध्यप्रदेश मुख्यमंत्री मोहन यादव यांनी लिहिलं आहे, "प्रदेशाचे नागरिक "आर्टिकल ३७०" चे कटू सत्य जाणावे, यासाठी आम्ही "Article ३७०" मध्यप्रदेशमध्ये टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींजींनी जम्मू-काश्मीरमधून "आर्टिकल ३७०" चे कलंक हटवून जम्मू-काश्मीरमध्ये विकासाची अपार संभावनांचे द्वार उघडले आहेत. हा चित्रपट जम्मू-काश्मीरच्या पहिल्या आणि आताच्या परिस्थिती जवळून पाहण्याची संधी देते".

चित्रपटाचे कौतुक

आदित्य धर यांचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपटाचे कौतुक होत आहे. धर यांनी याआधी उरी: द सर्जिकल स्ट्राईक चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. दरम्यान, अजय देवगनच्या शैतान चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग मध्य प्रदेशमध्ये चांगली झाली आहे. आता आर्टिकल ३७० टॅक्स फ्री झाल्यानंतर यामी गौतम-प्रियामणि स्टारर हा चित्रपट कमाईच्या बाबतीत पुन्हा एकदा जोर पकडू शकतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news