सुरक्षा दलांनी प्रथमच डागले ‘हेरॉन’ने ग्रेनेड!

सुरक्षा दलांनी प्रथमच डागले ‘हेरॉन’ने ग्रेनेड!

श्रीनगर, वृत्तसंस्था : काश्मीरमधील अनंतनागमध्ये रविवारी सलग सहाव्या दिवशीही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमक सुरूच आहे. गडुल कोकरनागच्या जंगलात आणखी 2 दहशतवादी दडून आहेत.

शनिवारी लष्कराने एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता; पण रात्री अंधार पडल्याने कारवाई थांबवण्यात आली होती. रविवारी ती पुन्हा सुरू झाली. घनदाट जंगलात 12 ते 20 फूट खोल गुहांमध्ये दहशतवादी लपलेले आहेत. गुहा बाहेरून झाकलेल्या आहेत, असे लष्कराकडून सांगण्यात आले. लष्कराचे कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धौनचक आणि जम्मू-काश्मीर पोलिस दलातील डीएसपी हुमायूँ भट या चकमकीत शहीद झाले आहेत. एक जवानही शहीद झाला आहे.

दुसरीकडे, बारामुल्लामधील नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) उरी, हातलंगा भागात शनिवारी मारल्या गेलेल्या 3 दहशतवाद्यांपैकी 2 दहशतवाद्यांचे मृतदेह लष्कराने ताब्यात घेतले; पण सीमेलगत पडलेला तिसरा मृतदेह पाकिस्तानी चौकीतून सतत गोळीबार होत असल्याने ताब्यात घेता आला नाही. दोघा दहशतवाद्यांची छायाचित्रे लष्कर-पोलिसांनी जारी केली असून, अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही.

या दहशतवाद्यांकडून दोन एके 47 रायफल, 7 मॅगझिन, एक चिनी बनावटीचे पिस्तूल, 7 हातबॉम्ब, 5 किलो आयईडी आणि इतर दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. पाकिस्तानी चलनात 6 हजार रुपये आणि भारतीय चलनात 46 हजार रुपयेही त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले आहेत.

दहशतवाद्यांविरुद्ध लष्कराने पहिल्यांदाच सर्वात प्रगत ड्रोन हेरॉन मार्क-2 चा वापर केला. ड्रोननेच दहशतवाद्याला शोधून काढले आणि त्याच्यावर ग्रेनेड फेकून त्याचा खात्मा केला. चकमकीदरम्यान मुसळधार पाऊस सुरू होता. यादरम्यानही हेरॉन ड्रोन काम करत राहिले. पंधरा कि.मी. वरून ते ऑपरेटरला ते चालवता येते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news