साहुराच्या पिरॅमिडमध्ये अनेक गुप्त खोल्या

साहुरा पिरॅमिड
साहुरा पिरॅमिड
Published on
Updated on

कैरो : इजिप्तमध्ये अनेक रहस्ययी पिरॅमिड आहेत. यापैकीच एक आहे ते साहुराचा पिरॅमिड. या साहुरा पिरॅमिडमध्ये अनेक गुप्त अशा साठवणीच्या खोल्या किंवा स्टोरेज रूम्स आहेत. 4400 वर्षांपूर्वीच्या या पिरॅमिडच्या बंद खोल्यांमध्ये अनेक रहस्ये दडलेली असू शकतात. हा पिरॅमिड इजिप्शियन फेरो अर्थात राजा साहुरा याच्यासाठी सुमारे 4400 वर्षांपूर्वी हा पिरॅमिड बांधला गेला होता.

या रहस्ययी पिरॅमिडमधील बंद असलेल्या खोल्या उघडल्याने पिरॅमिडचे संरचनात्मक मूळ आमि पिरॅमिडच्या आत फेरो साहुरा संदर्भातील अनेक रहस्य उलगडू शकतील असा दावा संशोधकांनी केला आहे. ज्युलियस-मॅक्सिमिलियन्स-विद्यापीठाची एक टीम साहुराच्या पिरॅमिड बाबत संशोधन करत आहे. साहुरा पिरॅमिडवर संशोधन करणार्‍या टीमने या पिरॅमिडमधील गुप्त दरवाजे शोधले आहेत. थ्री-डी लेझर स्कॅनिंग आणि क्षेत्राचे नकाशे यांच्या मदतीने ते पिरॅमिडच्या आत असलेल्या आठ खोल्यांपैकी एक गुप्त मार्ग उघडू उघडण्याचा प्रयत्न करत आहेत.

या गुप्त दरावाजाआड अनेक रहस्ये दडलेली आहेत. हे गुप्त दरवाजे उघडल्यास साहुरा पिरॅमिडशी संबंधित अनेक रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे. इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये अनेक राजांच्या ममी जतन करण्यात आल्या आहेत. इजिप्तमध्ये राजे-राण्यांचे मृतदेह रासायनिक प्रक्रिया करून कायमस्वरूपी जतन करून ठेवले जायचे. याला 'ममी' म्हणतात. अभ्यासकांना ममीफिकेशन, त्याचा धार्मिक विधी, पद्धती आणि वेगवेगळ्या टप्प्यांबाबत अजूनही संशोधन करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news