रोज एक सफरचंद खा! जाणून घ्या त्याचे आरोग्य आणि त्वचेसाठी फायदे

रोज एक सफरचंद खा! जाणून घ्या त्याचे आरोग्य आणि त्वचेसाठी फायदे

नवी दिल्ली : 'रोज एक सफरचंद ठेवते डॉक्टरांना दूर' म्हणजे रोज एका सफरचंदाचे सेवन केले तर त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहून डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येत नाही अशा अर्थाची एक आंग्ल भाषेतील म्हण आहे. फळांचे सेवन आरोग्यासाठी चांगले मानले जाते. अशी काही फळे आहेत जी त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर मानली जातात. या फळांपैकी एक म्हणजे सफरचंद.

हे स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्य आणि त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला त्याचे फायदे सांगणार आहोत. सफरचंदाचा रस त्वचेसाठी खूप फायदेशीर मानला जातो. यामध्ये विटामिन, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. सफरचंदाच्या रसामध्ये व्हिटॅमिन 'सी' आणि अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.

याशिवाय सफरचंदाचा रस रोज प्यायल्यास ते त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि त्वचा कोमल बनवण्यास मदत करते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करतात. सफरचंदात व्हिटॅमिन 'सी'चे प्रमाण जास्त असल्याने ते त्वचा चमकदार बनवते. या सर्वांशिवाय सफरचंदाचा रस त्वचेचा रंग स्वच्छ करतो आणि सर्व घाण काढून टाकतो. सफरचंदाचा रस पिण्याव्यतिरिक्त तुम्ही चेहर्‍यावरही लावू शकता. ही एक नैसर्गिक रेसिपी आहे, जी त्वचा चमकदार होण्यास मदत करते.

या सगळ्या व्यतिरिक्त ज्यूस प्यायल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. याचे रोज सेवन केल्याने हृदयाशी संबंधित आजार दूर राहतात. याशिवाय पचनक्रिया मजबूत होते आणि बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटी यासारख्या समस्या दूर होतात. जर तुम्ही लठ्ठपणाने त्रस्त असाल तर सफरचंदाचा रस पिऊ शकता. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. सफरचंदाच्या रसामध्ये व्हिटॅमिन 'ए' आणि 'सी' असते, जे त्वचा आणि केसांना निरोगी ठेवते. याशिवाय, ते हाडे मजबूत करते आणि अ‍ॅनिमियापासून बचाव होतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news