अप्पी आमची कलेक्टर : शिवानी नाईकची पहिली गाडी, फोटो व्हायरल

शिवानी नाईक
शिवानी नाईक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयुष्यातल्या पहिल्या गोष्टी नेहमी खास असतात मग ते पाहिलं काम असो, पहिली कमाई असो, पाहिलं घर असो किंवा पहिली गाडी. झी मराठीवरील चर्चित मालिका 'अप्पी आमची कलेक्टर' मधील शिवानी नाईक म्हणजेच तुमची लाडकी कलेक्टर अपर्णा सुरेश माने (अप्पी) हिने नुकतीच आपली पहिली गाडी घेतली आणि तिच्यासाठी तो क्षण खूप आनंदाचा होता.

संबंधित बातम्या – 

या यशस्वी स्वप्नपूर्तीचा आनंद व्यक्त करताना शिवानी म्हणाली, 'गाडी घ्यायची असं काही ठरलं नव्हतं पण असं वाटलं की शूटिंगला जाण्यासाठी अप्पीचीही गाडी असली पाहिजे. मी जेव्हा घरी सांगितले की मला गाडी घ्यायची आहे तेव्हा बाबा म्हणाले, मी घेऊन देतो पण माझ्यासाठी ही एक मोठी गोष्ट आहे, मला स्वतःच कष्टाने ही गाडी घ्यायची आहे. बाबांना याचा खूप अभिमान वाटला.

मी संपूर्ण परिवारासोबत गाडी आणायला गेलो. माझ्या हातात जेव्हा माझ्या पहिल्या गाडीची चावी आली तो क्षण माझ्या हृदयात कोरला गेली आहे. मी एक शांत चालक आहे. कारण अप्पीला नियम तोडून चालणार नाही आणि अप्पीची भूमिका निभावता निभावताना माझ्या आयुष्यात सुद्धा मी अप्पीच्या काही गुणांचा समावेश केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news