Badtameez Dil : हॉट वाणी कपूरसोबत “बदतमीज गिल “मध्ये दिसणार अपारशक्ती खुराणा

Badtameez Dil
Badtameez Dil

पुढारी ऑनलाईन डेस्क : अपारशक्ती खुराणा आता वाणी कपूर, परेश रावल आणि शीबा चढ्ढा यांच्यासोबत 'बदतमीज गिल' या कॉमेडी-ड्रामासाठी तयार होत आहे. (Badtameez Dil) या चित्रपटात अपारशक्ती हा मुलगा वाणी ही मुलगी तर परेश रावल आणि शीबा चढ्ढा त्यांच्या पेटंटची भूमिका साकारणार आहेत. (Badtameez Dil)

नवज्योत गुलाटी दिग्दर्शित याचे शूट बरेली आणि लंडन या दोन ठिकाणी होणार आहे. अपारशक्ती खुराणाने 'ज्युबिली', स्त्री', 'लुका छुपी', 'दंगल' आणि इतर अनेक प्रोजेक्ट्समध्ये वैविध्यपूर्ण पात्रे साकारली आहेत. परंतु आता हा अभिनेता या चित्रपटात काय काम करणार हे बघणं उत्सुकतेच असणार आहे.

दरम्यान, आगामी हॉरर-कॉमेडी 'स्त्री 2' मध्ये अपारशक्ती 'बिट्टू' ची भूमिका पुन्हा साकारताना पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. याशिवाय खुराना 'बर्लिन' या चित्रपटातही दिसणार आहे, जो एका मूकबधिर तरुणाची कहाणी मांडतो, ज्याला गुप्तहेर म्हणून अटक केली जाते. ॲपलॉज एंटरटेनमेंटचा 'फाइंडिंग राम' हा डॉक्युमेंटरीही त्याच्याकडे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaani Kapoor (@_vaanikapoor_)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news