Antonio Guterres : मानवतेचा विचार करुन इस्रायल-हमास यांनी युद्ध थांबवायला हवे : युनोचे आवाहन

Antonio Guterres
Antonio Guterres

Israel Hamas war : अनेक लोकांचे जीव आणि प्रदेशाचे भवितव्य अजूनही अस्तित्वात आहे. मानवतेचा विचार करुन इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा दहशतवादी गट हमास यांच्यामध्ये गाझा येथे सुरु असलेले युद्ध तात्काळ थांबवायला हवे, असे आवाहन संयुक्त राष्ट्र संघटनेचे सेक्रटरी जनलर अँटोनिओ गुटेरेस यांनी केले आहे. चीनची राजधानी बिजिंग येथे बोलताना त्यांनी दोन्ही राष्ट्रांना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. (Antonio Guterres)

अँटोनिओ गुटेरेस यांनी अपहरण केलेल्या लोकांची तात्काळ बिनशर्त सुटका करण्याचे आवाहन हमासकडे केले आहे. यावेळी त्यांनी हमासने अपहरण केलेल्या १९९ लोकांना उल्लेख केला. इस्रालयच्या इतिहासातील ही सर्वात घातक घटना असल्याचेही ते म्हणाले. इस्रायलनेही गाझामधील लोकांच्या मुलभूत गरजा पूर्ण कराव्यात. त्यासाठी कोणतेही बंधने न लावता प्रवेश करण्यास परवानगी द्यावी. कारण यामध्ये बहुसंख्य महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे, असेही ते या वेळी बोलताना म्हणाले. (Antonio Guterres)

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news