Asia Cup 2022 : अफगाणिस्ताचा ७ विकेट्स राखून बांगलादेशवर मोठा विजय

Asia Cup 2022 : अफगाणिस्ताचा ७ विकेट्स राखून बांगलादेशवर मोठा विजय
Published on
Updated on

दुबई; पुढारी ऑनलाईन : आशिया कपमधील ग्रुप २ मध्ये (Asia Cup 2022) अफगाणिस्तानने आपला दबदबा कायम ठेवला आहे. पहिल्या सामन्यात श्रीलंकेवर मोठा विजय नोंदवल्यावर अफगाणिस्तानने दुसऱ्या सामन्यात ७ विकेट्सनी बांगलादेशवर पुन्हा सहज विजय नोंदवला. अशा पद्धतीने अफगाणिस्तान आशिया कप या स्पर्धेत अंतिम चार अर्थात 'सुपर फोर'मध्ये पोहचणारा पहिला संघ बनला. त्यामुळे दुसऱ्या ग्रुपमध्ये श्रीलंका व बांगलादेशला सुपर फोरमध्ये पोहचण्यासाठी 'करो या मरो'ची स्थिती ओढावून घेतली आहे.

एक वेळी अफगाणिस्तानचा संघ (Asia Cup 2022) फसलेला असल्याचे पाहायला मिळाले. पण, इब्राहिम जारदान (४१ चेंडूत ४२ धावा) आणि नजिबुल्लाह जारदान (१७ चेंडूत ४३) यांनी अंतिम षटकांमध्ये बांगलादेशच्या जलदगती गोलंदाजांचा समाचार घेत १८.३ षटकात विजय नोंदविला.

बांगलादेशने ठेवलेल्या १२७ धावांचा सामना करायला उतरलेल्या अफगाणिस्तानच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात दिली. पाचव्या षटकात सलामीवीर रहमतुल्ला गुरबाज हा (१८ चेंडूत ११ धावा) बाद झाला तेव्हा संघाच्या १५ धावा झाल्या होत्या. त्यानंतर हजरतुल्ला झजाई आणि इब्राहिम जारदान यांनी डाव सावरत धाव फलक हालता ठेवला. झजाई पुन्हा एकदा मागील सामन्याप्रमाणे चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होता. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांप्रमाणे बांगलादेशच्या जलदगती व फिरकी गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत अफगाणिस्तानवर दबाब वाढवत होते.

दहाव्या षटकात जम बसलेला झजाई (२६ चेंडूत २३ धावा) बाद झाला. त्याच्यानंतर कर्णधार मोहम्मद नबी मैदानात उतरला. नबीला फारसे योगदान देता आले नाही. तेराव्या षटकात तो पायचित झाला. त्याने ९ चेंडतू ८ धावांचे योगदान दिले. नबी नंतर मैदानात नजीबुल्लाह जारदान उतरला. यावेळी अफगाणिस्तानची अवस्था ३ बाद ६२ अशी होती. येथे बांगलादेशला पुनरागमन करण्याची संधी होती. त्यांच्या गोलंदाजांनी दबाव देखिला वाढवला होता. एककाळ अफगाणिस्तानला जिंकण्यासाठी षटकामागे ११ धावा काढण्याची आवश्यकता होती. बांगलादेशचे फिरकी पटूंची गोलंदाजी संपल्यावर पुन्हा जलदगती गोलंदाज आले अन् खेळपट्टीवरील जारदान बंधूंनी आपल्या खेळीचा नूर बदलला आणि त्यांनी बांगलादेशच्या जलदगती गोलंदाजांची धुलाई सुरु केली. अखेर १८.३ षटकातच उर्वरीत धावा घेत ७ गडी राखून अफगाणिस्तानने बांगलादेशवर मोठा विजय नोंदवला. इब्राहिम जारदान याने ४१ चेंडूत ४२ धावा केल्या. या खेळीत त्याने ४ चौकार लगावले. तर नजिबुल्ला जारदार याने १७ चेंडत ४३ धावा करत एक चौकार आणि तब्बल ६ षटकारांची आतषबाजी केली.

नाणेफेक जिंकत बांगलादेशने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला पण, तो निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलटी आला. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी मागील सामन्याप्रमाणे या सामन्यात पकड मिळवली होती. त्यांच्या फिरकी गोलंदाजांसमोर बांगलादेशच्या फलंदाजांनी फक्त हजेरी लावण्याची कामगिरी बजावली. मोसद्दिक हुसेन (३१ चेंडूत ४८ धावा) आणि मोहमद्दुल्ला (२७ चेंडूत २५ धावा) या दोघांशिवाय कोणत्याही फलंदाजांना चांगल्या धावा करता आल्या नाहीत. अफगाणिस्तानकडून पुन्हा एकदा मुजीबने चार षटकात १६ धावा देत ३ बळी पटाकवले. तर स्टार फिरकीपटू राशिद खानने सुद्धा आपल्या ४ षटकात २२ धावा देत ३ बळी घेतले. तर एका फलंदाजास धाव बाद करण्यात आले. अफगाणिस्तानच्या फिरकीत अडकलेल्या बांगलादेशच्या फलंदाजांनी ७ गडी गमावत १२७ धावा बनवल्या होत्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news