Ankita Lokhande : ‘वीर सावरकर’ नंतर अंकिता लोखंडे आम्रपाली चित्रपटात !

ankita lokhande
ankita lokhande

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट निर्माते संदीप सिंग हे प्राचीन भारतातील वैशाली प्रजासत्ताकातील शाही नृत्यांगना आम्रपालीच्या जीवनाचा इतिहास मांडण्यासाठी सज्ज आहेत. (Ankita Lokhande) अभिनेत्री अंकिता लोखंडेला या सीरिजमध्ये प्रमुख आम्रपाली प्रसिद्ध आणि ग्लॅमरस नगरवधूची भूमिका साकारण्यासाठी सामील करण्यात आले आहे. शाही गणिका होण्यापासून ते बौद्ध नन बनण्यापर्यंतचा तिचा प्रवास यातून उलगडणार आहे. (Ankita Lokhande)

आम्रपालीने अनुभवलेल्या भावना आणि सुखसोयींचा केलेला त्याग, एक बौद्ध भक्त म्हणून ब्रह्मचर्य स्वीकारून तिच्या या प्रवासाची गोष्ट यात दिसणार आहे. चित्रपट निर्माते संदीप सिंग म्हणाले, "आम्रपाली तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जात होती आणि ती भारताच्या इतिहासातील सर्वात मजबूत पात्रांपैकी एक होती. मी या भूमिकेसाठी अंकिता लोखंडेशिवाय कोणालाच पाहू शकलो नाही. जिने 'स्वातंत्र्य वीर' चित्रपटात तिच्या नेत्रदीपक अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या भूमिकेसाठी ती अगदी योग्य आहे. कारण तिच्याकडे एक मोहक राजकुमारी आणि नागरवधूचे सर्व गुणधर्म आहेत. कारण ती एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. अंकिता तिच्या डोळ्यांतून सुंदर भावना व्यक्त करते जे आम्रपालीचे सगळं सार टिपेल.

"या सहकार्याविषयी बोलताना अंकिता लोखंडे म्हणाली, "माझ्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटात यमुनाबाईची भूमिका केल्याबद्दल मला जगभरातून खूप कौतुक मिळाले आहे. त्यामुळेच मला सशक्त भूमिकांसह अनेक चित्रपटाच्या ऑफर्स मिळत आहेत. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' नंतर अता आम्रपाली मध्ये काम करायला मिळणं यासारखं सुख अजून काय हवं ! आम्रपाली माझ्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज असेल."

संगीतकार इस्माईल दरबार म्हणाले, "'हम दिल दे चुके सनम' आणि 'देवदास' नंतर 'आम्रपाली' हा माझ्यासाठी सर्वात आव्हानात्मक संगीतमय प्रवास असेल कारण ही कथा एका नर्तिकेची आहे, जी आयुष्यापासून निराश होऊन अध्यात्मवाद स्वीकारते. 'आम्रपाली' हा चित्रपट संदीप सिंग प्रस्तुत करत असून लीजंड स्टुडिओज निर्मित आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news