Ankita Lokhande Heeramandi Screening : अंकिता लोखंडेची हिरामंडीच्या प्रीमियरला विकी जैनसह हजेरी

ankita-sanjay leela bhansali-vicky jain
ankita-sanjay leela bhansali-vicky jain

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री अंकिता लोखंडेने अलीकडेच पती विकी जैनसोबत संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हिरामंडी'च्या प्रीमियरला हजेरी लावली. (Ankita Lokhande Heeramandi Screening) अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर संजय लीला भन्साळीसोबतचा एक फोटो शेअर केला आणि त्यांचा आगामी वेब शोबद्दल कौतुक केलं. (Ankita Lokhande Heeramandi Screening)

"भव्य सेट आणि अफलातून कहाणी असलेल्या या वेब शो मध्ये कमालीची गोष्ट आहे. त्यांच्या या मालिकेत त्यांनी महिलांना ज्याप्रकारे सादर केले ते कमालीचं सुंदर आहे. संजय सरांकडे त्यांच्या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांना दुसऱ्या जगात पोहोचवण्याची उल्लेखनीय क्षमता आहे."
अंकिताने पोस्ट शेअर केल्यापासून तिचे चाहते या अभिनेत्रीला संजय लीला भन्साळीच्या प्रोजेक्ट्समध्ये बघण्यासाठी उत्सुक आहेत.

 अंकिता मोठ्या व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारत आहे. 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' आणि नुकत्याच रिलीज झालेल्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' मधील तिच्या भूमिकेला समीक्षकांची प्रशंसा मिळालीय.

तिने आणखी एक पीरियड ड्रामा 'आम्रपाली' साईन केला आहे. ती संदीप सिंगच्या प्रोडक्शन व्हेंचरमध्ये शाही गणिका आम्रपालीची भूमिका साकारण्यासाठी तयारी करत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news