Ankita Lokhande : अंकिता लोखंडेबद्दलचं सलमान खानने केलेलं ‘हे’ भाकीत ठरलं खरं

ankita lokhande
ankita lokhande

पुढारी ऑनलाईन डेस्क – अंकिता लोखंडे बद्दल सलमान खान चा हा अंदाज ठरला खरा 'बिग बॉस 17' च्या मंचावर सलमान खान (Ankita Lokhande) अंकिताच्या करिअरबद्दल जे काही भाकीत केले होते ते खरे ठरत असल्याने अंकिता लोखंडेला (Ankita Lokhande) खूप आनंद होतोय. सलमान खानने होस्ट केलेल्या 'बिग बॉस १७' या रिॲलिटी शोमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून ती शोची चौथी उपविजेती ठरली. (Ankita Lokhande)

अंकिता बाहेर पडल्याबद्दल सलमानने एक गोष्ट आवर्जून सांगितली आणि एक असे भाकीत केले होते की, "अभिनेत्री रिॲलिटी शोनंतर बॅक-टू-बॅक प्रोजेक्ट्समध्ये बिझी होईल."

रिॲलिटी शो संपल्यापासून अंकिता लोखंडे 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी झालीय. ज्यामध्ये तिने यमुनाबाईच्या भूमिकेत सगळ्यांना आपलंसं केलं. त्यानंतर विकी जैन सोबत 'ला पिला दे शराब' नावाच्या सिंगलमध्ये झळकली.

सलमानच्या या वक्तव्याची आठवण करून देताना अंकिता एका मुलाखतीत म्हणाली, "जेव्हा सलमान सर म्हणाले की, माझ्यासाठी ते सर्व काही आहे. मी "आनंद" आणि "कृतज्ञ" आहे की सलमान सरांचे शब्द माझ्यासाठी खरे ठरले आहेत आणि मी अनेक महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट्स करतेय."

सध्या अंकिता संदीप सिंगच्या मॅग्नम ओपस मालिका 'आम्रपाली'मध्ये प्रमुख महिला म्हणून काम करणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news