Sajid Khan : साजिद खान बनवणार आशिकी ४? ‘बिग बॉस’ची हिट जोडी दिसणार!

sajid khan
sajid khan

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस १६' हा रिअॅलिटी शो संपला असून त्यातील स्पर्धक आजही चर्चेत आहेत. एकीकडे शोमधील स्पर्धक एमसी स्टॅन आणि अब्दू रोजिक यांच्यातील भांडण तर जगजाहीर झाले. तर दुसरीकडे शोमधील अंकित गुप्ता आणि अभिनेत्री प्रियांका चहर चौधरी यांची क्यूट जोडी चाहत्यांना पाहायला मिळाली. दरम्यान, एका मुलाखतीत चित्रपट निर्माता साजिद खान ( Sajid Khan) याच्याकडे आगामी 'आशिकी ४' चित्रपटाची मागणी करण्यात आली आहे. हे वृत्त जर खरे असल्यास अंकित आणि प्रियांका चहर यांच्या फॅनसाठी आनंदाची माहिती असणार आहे. परंतु, याबद्दलचे अधिकृत माहिती मिळालेली नाही.

अभिनेत्री प्रियांका चहर काही दिवसांपूर्वी अंकित गुप्ताच्या 'जुनूनियत' शोच्या सेटवर दिसली होती. यानंतर पुन्हा एकदा रात्री मुंबईत एकत्रित स्पॉट झाले. यावेळी खास करून अंकित आणि प्रियांका यांच्यासोबत निर्माता साजिद खान दिसला. यामुळे ही चर्चा आगामी चित्रपटासंदर्भात घडली असल्याची चर्चा रंगू लागली आहे. 'बिग बॉस १६' शो संपल्यानंतरही त्यांचे बाँडिंग कायम असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी साजिदने मीडियाशी मनमुराद संवाद साधला.

साजिद खान बनवणार आशिकी ४?

निर्माता साजिद खान ( Sajid Khan ), अंकित गुप्ता आणि प्रियांका चाहर हे तिघेजण मुंबईत स्पॉट झाल्यावर पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, अंकितने साजिदकडे 'आशिकी ४' बनवण्याची मागणी केली आणि दोघांनाही कास्ट करू शकतो असेही म्हटलं. यावर साजिदने हसत-हसत उत्तर देताना म्हणाला की, 'जसे आम्ही 'बिग बॉस १६' शोमध्ये सांगितले होते की, घरातून बाहेर पडल्यानंतर भेटू. हाच तो शो.

'बिग बॉस १६' शो सोडल्यानंतर अंकित त्याच्या कामात खूपच बिझी झाला. मात्र, मुंबईत आल्यावर त्यांनी भेटण्याचा बेत आखला. दरम्यान मी प्रियांका आणि अंकितशी फोनवर संपर्कात होतो. यावरून आमचे नाते धट्ट असल्याचे निदर्शनास येत आहे. यावरून साजिद खान आशिकी ४ आणणार की नाही? असा प्रश्न सिनेरसिकांना पडला आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news