animal crimes : पशूंवरील अत्याचाराचे 338 खटले; महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर

animal crimes : पशूंवरील अत्याचाराचे 338 खटले; महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर
Published on
Updated on

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : animal crimes : कठोर कायदे असतानाही गुन्हेगारीच्या घटना वाढतच आहेत. माणसांप्रमाणेच पशूही असुरक्षित बनला आहे. गेल्या 10 वर्षांत पशूंवरील अत्याचाराच्या 5 लाखांहून अधिक घटनांची नोंद झाली. यात निर्घृण हत्या, विषप्रयोग आणि अनैसर्गिक कृत्यासारख्या घटना आहेत. त्यापैकी मोजक्याच प्रकरणात गुन्हे दाखल होऊन ते न्यायालयात गेले. यात महाराष्ट्र देशात तिसर्‍या क्रमांकावर आहे. देशभरातील 338 प्रकरणांपैकी 42 प्रकरणे महाराष्ट्रातील आहेत.

2016 मध्ये मुुंबईत 10 कुत्र्यांची ( animal crimes ) दगडाने ठेचून हत्या केली. पुण्यात बाणेरमध्ये 4 कुत्र्यांना जाळले, 16 कुत्र्यांना विष देऊन मारले. 2019 मध्ये बुलडाण्यात 90 कुत्र्यांचे सांगाडे सापडले. बंगळूरजवळ 30 वानरांना विष पाजले. तामिळनाडूत इमारतीतील मांजर पकडण्यासाठी मुले नेमली. त्यांच्याकडून दोन पोत्यांत भरलेल्या मृत मांजरी सापडल्या. पशुप्रेमीच नव्हे तर कोणाचेही हृदय हादरवून टाकणार्‍या घटना देशात वाढतच आहेत.

पशू, पक्ष्यांवरील अत्याचाराच्या  ( animal crimes ) घटनांत प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, 1960 अंतर्गत कारवाईची तरतूद आहे. केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी 30 नोव्हेंबर रोजी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारच्या 338 खटल्यांची विविध न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पैकी 44 खटले सर्वोच्च न्यायालयात, 5 राष्ट्रीय हरित लवादात तर उर्वरित राज्यांच्या वेगवेगळ्या न्यायालयात आहेत. सर्वाधिक 66 खटले तामिळनाडू, दिल्ली 43 तर महाराष्ट्रात 42 खटले सुुरू आहेत. गुन्हे दाखल होऊन न्यायालयात पोहचलेले खटले नावालाच असल्याचा दावा प्राण्यांसाठी काम करणार्‍या फेडरेशन ऑफ इंडियन अ‍ॅनिमल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन (फिआपो) या स्वयंसेवी संस्थाने केला आहे. त्यांनी देशात पहिल्यांदाच 2010 ते 2020 दरम्यान प्राण्यांवरील अत्याचाराचा अभ्यास केला. त्यानुसार 10 वर्षांत अशा 4,93,910 घटनांची नोंद आहे. तर नोंद नसणार्‍या घटना 10 लाखांच्या घरात असल्याचे अभ्यास सांगतो.

पशूंवरील अत्याचाराच्या घटना कित्येक पट अधिक आहेत. ते पशू असल्याने बोलू शकत नाहीत, तक्रार देऊ शकत नाहीत. समाजात मनुष्याएवढेच प्राण्यांनाही स्थान आहे. सर्व मिळून समाज तयार होतो. अशा प्रकरणांत अधिकाधिक गुन्हे दाखल होऊन खटले चालावेत. आरोपींना शिक्षा मिळावी.
-वरदा मेहरोत्रा, कार्यकारी संचालक, फिआपो

अत्याचाराच्या काही घटना animal crimes

औरंगाबादमध्ये कुत्र्याला दोरीने गाडीला बांधून फरफटत नेले.
केरळात 21 मांजरींना विष देऊन मारले.
वेल्लोर येथे मेडिकल कॉलेजच्या मुलींनी होस्टेलमध्ये माकडाला जखमी करून तिसर्‍या मजल्यावरून फेकले.
दक्षिण दिल्लीत 18 वर्षीय तरुणाचा गायीच्या बछड्यावर तर जबलपुरात कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार
गोव्यात कुत्रीच्या गुप्तांगात स्क्रू ड्रायव्हर टाकून जखमी केले
तेलंगणात झाडाला लटकावून केलेल्या मारहाणीत माकडाचा मृत्यू

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news