IIFA 2023 : अनिल कपूरला ‘जुग जुग जीयो’ चित्रपटासाठी खास पुरस्कार

IIFA 2023 अनिल कपूर
IIFA 2023 अनिल कपूर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरने आपला पुरस्कारांचा सिलसिला कायम सुरू ठेवत यंदाच्या आयफा अवार्ड्स ( IIFA 2023 ) मध्ये बेस्ट सपोर्टिंग रोल (मेल) पुरस्कार पटकावला आहे. अनिलला त्याच्या 'जुग जुग जीयो' या चित्रपटासाठी 'परफॉर्मन्स इन अ सपोर्टिंग रोल – पुरुष' चा खास पुरस्कार मिळाला आहे.

अभिनेता अनिल कपूरने त्यांचा अभिनयातून नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. करिअरमध्ये विविध भूमिका साकारून त्याने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. नुकताच त्याला आयफा २०२३ ( IIFA 2023 ) पुरस्कार सोहळ्यात 'परफॉर्मन्स इन अ सपोर्टिंग रोल – पुरुष ' यासाठी सन्मानित करण्यात आलं आहे. अनिल कपूरना 'जुग जुग जियो' चित्रपटातील दमदार अभिनयासाठी हा खास पुरस्कार देण्यात आला आहे.

IIFA 2023 अनिल कपूर
IIFA 2023 अनिल कपूर

या वर्षात अनिलने फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक पुरस्कार जिंकले आहेत. त्यामुळे हे वर्ष त्यांच्यासाठी नक्कीच पुरस्कारमय झाले आहे असे म्हटलं जातं आहे. अनिल कपूरकडे आगामी काळात बहुप्रतीक्षित अनेक चित्रपटाची ऑफर आहे. यात 'अॅनिमल', 'फायटर' आणि अभिनव बिंद्रा बायोपिक यासारखे अनेक कमालीच्या प्रोजेक्ट्समधून तो दिसणार आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news