Anil Deshmukh’s bail : अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

Anil Deshmukh’s bail : अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

पुढारी ऑनलाईन: खंडणीप्रकरणी ईडीच्या ताब्यात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र न्यायालयाने ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. त्यामुळे कथित १०० कोटी खंडणीप्रकरणी अनिल देशमुख यांच्या जामीनावरील सुनावणी आता ६ डिसेंबरला होणार आहे, असे न्यायालयाने सांगितले आहे.

अनिल देशमुख यांना 100 कोटींच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना आरोग्याच्या कारणास्तव उपचारासाठी परवानगी देण्यात आली होती. दरम्यान अनिल देशमुख यांनी न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला होता. पण सीबीआयने अनिल देशमुख यांच्या जामिनाला विरोध करत, मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याप्रकरणी आज सुनावणी होणार होती. मात्र, आज न्यायालयाने पुन्हा एकदा देशमुखांच्या (Anil Deshmukh) अर्जावरील सुनावणी पुढे ढकलत मोठा धक्का दिला आहे.

73 वर्षीय देशमुख सध्या अतिताण, ह्रदयविकार यांसारख्या विविध गंभीर आजारांनी त्रस्त आहेत. त्यामुळे त्याच्यांवर एका खाजगी रूग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. तसेच सीबीआयने कथित खंडणी वसुली प्रकरणात केलेले सगळे आरोप तथ्यहीन, निराधार असल्याचा युक्तिवाद देशमुख यांच्या वकिलांनी वेळोवेळी केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news