फेमा प्रकरणी अनिल अंबानींची ईडीकडून ७ तास चौकशी

फेमा प्रकरणी अनिल अंबानींची ईडीकडून ७ तास चौकशी
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी उद्योगपती अनिल अंबानी यांची सोमवारी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) सात तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी करण्यात आली. अनिल अंबानी ईडीच्या बेलार्ड पिअर येथील कार्यालयात सोमवारी सकाळी १० वाजता हजर झाले. या प्रकरणासंदर्भात आणि चौकशीबाबत ईडीने कोणतीही माहिती दिलेली नाही.

विदेशातील बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात प्राप्तीकर खात्याने सुरु केलेल्या चौकशी संबंधी अनिल अंबानी ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते, असे सुत्रांनी सांगितले आहे. गेल्या वर्षी स्वीस बॅंकेच्या दोन खात्यांमध्ये आढळून आलेल्या ८१४ कोटी रुपयांवरील ४२० कोटी कर चुकविल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने प्राप्ती खात्याला १७ मार्चपर्यंत अनिल अंबानी यांच्यावर कठोर कारवाई न करण्याचा आदेश दिला होता.

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news