पुढारी ऑनलाईन डेस्क : अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी झाल्याचे वृत्त खोटे असल्याची माहिती समोर आली आहे. काही हिंदी आणि इंग्रजी वेबसाईट्सनी अमिताभ बच्चन यांच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया झाली नसून ही अफवा पसरल्याचे म्हटले आहे. (Amitabh Bachchan Fake News) उलट ते अभिषेक बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांच्यासोबत एन्जॉय करत असल्याचे समोर आले आहे. (Amitabh Bachchan Fake News)
सोशल मीडियावर सेलेब्सशी संबंधित अनेक खोट्या बातम्या येत असतात. शुक्रवारी महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी झाल्याचे वृत्त समोर आले. अनेक वृत्तांमध्ये सांगण्यात आले होते की, प्रकृती अस्वास्थ्यामुळे अमिताभ यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता , हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले जात आहे. १४ मार्चच्या सायंकाळी अमिताभ बच्चन हे अभिषेक बच्चनसोबत मुंबईत दिसले होते. ते इंडियन स्ट्रीट प्रेमियर लीग (ISPL) मध्ये अभिषेकची टीम माझी मुंबईचा क्रिकेट सामना पाहायला गेले होते. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला की, फिट अँड फाईन दिसणाऱ्या बिग बी अचानक रुग्णालयात कसे पोहोचले.