Anarasa Recipe : स्वादिष्ट अनारसे कसे कराल?

Anarasa Recipe : स्वादिष्ट अनारसे कसे कराल?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सणासुदीचे दिवस सुरू झाले की, स्पेशल रेसिपी बनवणं हा एक रिवाज आहे. प्रत्येक सणाची काही स्पेशल रेसिपी असते. त्यात दिवाळी हा महत्वाचा सण आहे. कारण, या सणामध्ये अनेक रेसिपी असतात. लाडू, चिवडा, करंजी, चकली, शंकरपाळी, कापण्या, शेव, अनारसे (Anarasa Recipe), बाकरवडी अशा अनेक रेसिपींची मेजवाणीच असते. दिवाळीच्या सणानिमित्त आपण काही स्पेशल रेसिपी पाहणार आहोत. त्यातील आज महाराष्ट्रातील खास 'अनारसे' रेसिपी पाहूया…

साहित्य

१) एक कप तांदूळ

२) एक कप किसलेला गूळ

३) एक चमचा खसखस

४) तळण्यासाठी तेल

५) तूप

कृती 

१) सर्वांत पहिल्यांदा तांदूळ ३ दिवस पाण्यात भिजवून ठेवावे. पण, प्रत्येक दिवशी पाणी बदलून घ्यावे.

२) चौथ्या दिवशी चाळणीत पाणी नितळण्यासाठी ठेवावे. नंतर ते तांदूळ पंचा घेऊन कोरडे करून घ्या. ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. पुन्हा ते पीठ चाळून घ्या.

३) त्या तांदळाच्या पिठात १ चमचा तूप घालून घट्ट मळून घ्या. हा घट्ट झालेला पिठाचा गोळा किमान सहा दिवस बंद डब्यात घालून ठेवा.

४) लक्षात ठेवा स्टिलच्या डब्याऐवजी प्लॅस्टिकचा डबा वापरा. हे पीठदेखील प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून डब्यात घाला.

५) सहा दिवस उलटून गेले की, हे पीठ बाहेर काढा. मध्यम गॅसवर तेल किंवा तूप गरम करा. सुपारीच्या आकाराचे पिठाचे गोळे करून घ्या. नंतर पुरीइतक्या आकाराचे लाटून घ्या, लाटताना पुरी खसखसीवर लाटा.

६) लाटल्यानंतर ज्या भागाला खसखस लागलेली ती बाजू वर ठेवा आणि तळत असाताना पुरीची बाजू पलटू नका. याचा फायदा असा की, खसखस जळत नाही.

७) ती पुरी टाकली की, फुलते आणि पसरट होते. त्यामुळे झारा तेलातील पुरीवर कडेने धरावा म्हणजे पुरी तुटत नाही.

८) समजा अनारसे तळताना खूप वेळा हा प्रयोग फसतो. तर त्यावेळी हे पीठ डब्यात भरून द्यायचं. नंतर त्या पिठाचे अनारसे करता येतात. कारण, हे पीठ पाच-सहा दिवसानंतरही सहज टिकते.

९) मध्यम गॅसवर अनारसेला सोनेरी रंग मिळेपर्यंत तळावेत. तळल्यानतंर ते चाळणीत घालून तेल निथळून द्यावे. अशाप्रकारे गोड अनारसे (Anarasa Recipe) तयार झाले.

पहा व्हिडिओ : लोणच्याची ही रेसिपी एकदा ट्राय कराच…

या रेसिपी वाचल्यात का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news