नागवडे, पाचपुते सेफ, नेत्यांना सोयीचे गट; तर कार्यकर्त्यांना पंचायत समितीची संधी

नागवडे, पाचपुते सेफ, नेत्यांना सोयीचे गट; तर कार्यकर्त्यांना पंचायत समितीची संधी

श्रीगोंदा : गट-गण रचनेच्या आराखड्यात पिंपळगाव पिसा हा सातवा गट अस्तित्वात येणार असून, जगताप, नागवडे, पाचपुते यांच्यासाठी सोयीचे गट तयार झाले आहेत. जिल्हा परिषदसाठी इच्छुक असणार्‍या कार्यकर्त्यांना; मात्र पंचायत समितीवर समाधान मानावे लागणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर, आता गट आणि गण रचना अस्तित्वात येत आहे. अर्थात या गट आणि गण रचनेसाठी हरकती घेतल्या जाणार आहेत.

पिंपळगाव पिसा गटाची या आराखड्यात निर्मिती झाल्याने माजी आमदार राहुल जगताप यांच्या पत्नी डॉ. प्रणोती जगताप यांच्यासाठी हा गट सोयीचा तयार झाला आहे. पिंपळगाव पिसा जगताप यांचे गाव असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक हातात असणार आहे. जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असणार्‍या कल्याणी लोखंडे यांची मात्र या गटाच्या निर्मितीमुळे अडचण झाली आहे. अर्थात लोखंडे यांच्यासाठी जगताप ऐनवेळी वेगळा निर्णय घेऊ शकतात.

मांडवगण गटात विशेष काही बदल झाला नसल्याने सचिन जगताप, बाबासाहेब भोस यांच्यासाठी या गटाची निर्मिती सोयीची ठरणार आहे. बेलवंडी गट अण्णासाहेब शेलार यांच्यासाठी पूरक असून, या गटात विशेष बदल झालेला नाही. काष्टी गटही जैसे थे असून या गटात प्रतिभा पाचपुते, अरुण पाचपुते, सुवर्णा पाचपुते, साजन पाचपुते यांना ही निवडणूक सोयीची असणार आहे. या गटात अजनुज गणाची नवीन निर्मिती झाली आहे. लिंपणगाव गटात वांगदरी गावचा समावेश झाल्याने हा गट नागवडे गटासाठी हिताचा ठरणार आहे. आदेश नागवडे, दीपक नागवडे यांच्यासाठी हा सोयीचा गट आहे. नागवडे, जगताप, पाचपुते, भोस यांच्यासाठी आपापले गट सोयीचे झाले.

आढळगावची समीकरणे पूर्णतः बदलणार

आढळगाव गटातून आनंदवाडी वगळली गेल्याने विद्यमान जिल्हा परिषद सदस्या पंचशीला गिरमकर यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे. स्वतःचे गावच वगळले गेल्याने ते आढळगाव गटातून निवडणूक लढवतील की नाही हा प्रश्न आहे. मागील वेळी बाळासाहेब गिरमकर यांच्या पत्नी आढळगाव गटातून निवडणूक लढल्या होत्या; मात्र उचल उमेदवार आढळगाव गटाने स्वीकारला नाही. आढळगाव गटात तांदळी दुमाला, देऊळगाव या गावाचा समावेश झाल्याने या गटाची समीकरणे पूर्णतः बदलणार आहेत.

एक नजर बदलावर

अनुराधा नागवडेेंचा बेलवंडी, पाचपुतेंचा काष्टी आणि सुवर्णा जगतापांचा मांडवगण गट नव्या रचनेत कोणतीही तोडफोड न होता कायम राहिली. तालुक्यात पिंपळगाव पिसा हा नवीन गट अस्तित्वात आला. या नवनिर्मितीने माजी आमदार राहुल जगताप यांच्या वर्चस्वाला संधी मिळणार आहे. कोमल वाखारे यांच्या येळपणे गटाचे अस्तित्व संपवून लिंपणगावची निर्मिती झाली.

श्रीगोंदा : गट-गण रचनेच्या आराखड्यात पिंपळगाव पिसा हा सातवा गट अस्तित्वात येणार असून, जगताप, नागवडे, पाचपुते यांच्यासाठी सोयीचे गट तयार झाले आहेत. जिल्हा परिषदसाठी इच्छुक असणार्‍या कार्यकर्त्यांना; मात्र पंचायत समितीवर समाधान मानावे लागणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news