पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅसिफिक महासागरातील छोटे बेट असलेले सोलोमन बेट मंगळवारी शक्तिशाली भूकंपाने हादरले आहे. सोलोमन बेटाच्या नैऋत्येस मलांगो येथे झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.३ एवढी आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू १० किमीवर भूगर्भात असल्याची माहिती अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण विभागाने (USGS Earthquakes) दिली आहे. या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
या भूकंपानंतर जीवितहानी अथवा कसल्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण विभागानुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू होनियारापासून ५६ किलोमीटर (३५ मैल) नैऋत्येस १३ किलोमीटर (८ मैल) खोलीवर समुद्रात होता. या भूकंपामुळे सोलोमन बेटांवरील किनारपट्टीवर भरतीच्या पातळीपेक्षा १ मीटर (३ फूट) पर्यंत उंच लाटा उसळू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे.
हे ही वाचा :