chandramukhi : ‘चंद्रमुखी’च्या भूमिकेत दिसणार अमृता खानविलकर

chandramukhi : ‘चंद्रमुखी’च्या भूमिकेत दिसणार अमृता खानविलकर

पुढारी ऑनलाईन : दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी बहुचर्चित आगामी 'चंद्रमुखी' ( chandramukhi ) हा चित्रपट चाहत्याच्या भेटीस घेवून येत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या टिझरमध्ये दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या एका नृत्यांगणाची झलक दाखविली होती. परंतु, ही नृत्यांगणा कोण आहे ? यांचा उलघडा झालेला नव्हता. तर सध्या या प्रश्नाचे उत्तर मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने सोशल मीडियावर दिले आहे.

अमृता खानविलकरने नुकतेच आपल्या इन्स्टाग्रामवर चंद्रमुखी ( chandramukhi ) चित्रपटातील नव्याने एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अमृता खानविलकर स्वत: नृत्यांगणाच्या भूमिकेत स्पष्ट दिसत आहे. हा पोस्टर शेअर करताना अमृताने लाल रंगाच्या साडीसोबत हिरव्या रंगाचे ब्लाऊज परिधान केल्याचे दिसत आहे. यासोबत तिने साजेशीर मेकअपसोबत केंसात गजरा माळला आहे.

या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये तिने 'चंद्रा नक्की कोण?. ती दिसते कशी?. ती हसते कशी?.जिच्या दिलखेचक अदांसाठी तुम्ही आतुर होता, ती चंद्रा आता तुमच्या समोर अवतरली आहे. ढोलकीच्या तालात, घुंगरांची साथ घेऊन, तुम्हा रसिकांच्या टाळ्या शिट्ट्यांच्या गजरात, मी चंद्रा तुमच्या समोर आले आहे. तुमचं मनोरंजन करायला आले आहे, तुम्हाला प्रेमाची नवी व्याख्या सांगायला आणि लावणीच्या ठेक्यात मनमुराद नाचवायला, तर मग तयार आहात ना?" असे लिहिले आहे.

या फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांना आगामी 'चंद्रमुखी' चित्रपटात अमृता खानविलकर नृत्यागणाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समजले आहे. यामुळे या चित्रपटासाठी चाहत्यांनी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये ढोलकीचा ताल, घुंगरांचे बोल आणि साजशृंगार, सौंदर्याची नजाकत आणि सोबत दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणारी नृत्यांगना पाहायला मिळाली होती.

'चंद्रमुखी' हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहे. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत अभिनेता आदिनाथ कोठारे दिसणार आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे संगीत लाभले आहे. हा चित्रपट २९ एप्रिल २०२२ रोजी चाहत्याच्या भेटीस येत आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news