मृत बिबट मादीचे शव वन्यप्राणी प्रथमोपचार केंद्र वडाळी येथे आणण्यात आले आहे. त्या ठिकाणी पशुधन विकास अधिकारी डॉ. ए.जे. मोहोड तसेच पशुधन विकास अधिकारी डॉ. सागर ठोसर यांनी बिबट मादी मृतदेहाची प्राथमिक तपासणी केली. मादी बिबट अंदाजे ३ ते ४ वर्ष वयाची असल्याचे दिसून आले. त्यानंतर बांबू गार्डन परिसरातील नियोजित ठिकाणी उपवन संरक्षक मेळघाट परतवाडा विभाग, परतवाडा, कॅम्प व वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक, मानद वन्यजीव रक्षक जयंत वडतकर, वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी व वनरक्षक, वनपाल, मेळघाट व्याघ्र प्रकल्प वाईल्ड क्राईम सेलचे कर्मचारी व दोन पंच समक्ष प्रयोगशाळेचे पशुधन विकास अधिकारी डॉ. ए. जे. मोहोड व शल्य चिकित्सालयाचे पशुधन विकास अधिकारी डॉ. सागर ठोसर यांनी बिबट मादी या मृत वन्यजीवाचे शवविच्छेदन केले.