अमरावती, पुढारी वृत्तसेवा: अमरावतीवरून तुकईथडकडे जाणारी एसटी बस धारणी-चिखलदरा मार्गावर अनियंत्रित होऊन ३० फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात रविवारी (दि.२४) दुपारी बाराच्या दरम्यान झाला. अपघातात दोन महिलांसह एका बालकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. बसमध्ये जवळपास 30 प्रवासी प्रवास करत होते. Amravati Accident News
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना नजीकच्या सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केली. Amravati Accident News आज सकाळी परतवाडा आगाराची (एम एच 07 सी 94 78) ही बस अमरावतीवरून धारणीमार्गे मध्य प्रदेशातील तुकईथडकडे जात होती. दरम्यान, चिखलदरा मार्गावर जवाहर कुंड येथील वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस अनियंत्रित झाली आणि ३० फूट खोल दरीत कोसळली.
या अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. चिखलदरा पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले. परतवाडा आगाराचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. होळी सणाला आदिवासी बांधवांमध्ये विशेष महत्त्व आहे. त्यामुळे अनेक जण होळी सण साजरा करण्यासाठी घरी जात असतात.