Amol Kolhe on Terrorism: बतावण्या करणाऱ्या केंद्र सरकारने “दहशतवाद” गांभीर्याने घ्यावा- खासदार अमोल कोल्हे

Amol Kolhe on Terrorism
Amol Kolhe on Terrorism

पुढारी ऑनलाईन डेस्क: जम्मू काश्मीरमधील राजोरी येथे दहशतवाद्यांनी काल (दि.२२) रात्री भ्याड हल्ला केला. या हल्लात भारतीय सैन्याचे ५ जवान शहीद झाले. या घटनेवरून केंद्र सरकारच्या धोरणांवर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी हल्लाबोल केला. या संदर्भात पोस्ट त्यांनी त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विट) अकाऊंटवरून केली आहे. (Amol Kolhe on Terrorism)

अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे की, ही घटना मनाला वेदना देणार आहे. नोटबंदी केल्यानंतर दहशतवाद नाहीसा होईल, कलम ३७० रद्द केल्यानंतर दहशतवाद नाहीसा होईल, अशा बतावण्या केंद्र सरकारने केल्या होत्या. पण केंद्र सरकारने "दहशतवाद" या मुद्द्याकडे राजकारणाचा दृष्टिकोनातून न बघता हे गांभीर्याने बघितलं पाहिजे, असा सल्ला त्यांनी मोदी सरकारला दिला आहे. (Amol Kolhe on Terrorism)

भारतमातेच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या प्रत्येक भूमिपुत्राचे प्राण मौल्यवान आहेत. याची जाणीव सरकारने ठेवली पाहिजे, असे विधान देखील त्यांन केले आहे. तसेच दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती भावपुर्ण श्रध्दांजली वाहीली आहे. (Amol Kolhe on Terrorism)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news