Amit Shah Sister Passes Away: गृहमंत्री अमित शाह यांच्या बहिणीचे निधन, पुढील दोन दिवसांचे कार्यक्रम रद्द

Amit Shah Sister Passes Away: गृहमंत्री अमित शाह यांच्या बहिणीचे निधन, पुढील दोन दिवसांचे कार्यक्रम रद्द

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्या मोठ्या बहिणीचे नुकतेच निधन झाले. राजेश्वरीबेन शाह यांनी आज सकाळी मुंबई येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान पुढील दोन दिवसांचे गृहमंत्र्यांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. या संदर्भातील वृत्त माध्यमांनी दिले आहे. (Amit Shah Sister Passes Away)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मोठी बहीण राजेश्वरीबेन यांचे सोमवारी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. राजुबेन यांचे काही महिन्यांपूर्वी फुफ्फुस प्रत्यारोपण झाले होते आणि त्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर अमित शहा यांनी गुजरातमध्ये होणारे दोन सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले. अमित शहा आज गुजरातमध्ये दोन सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावणार होते. एक कार्यक्रम बनासकांठा जिल्ह्यातील देवदार येथील बनास डेअरी आणि दुसरा गांधीनगर येथील राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठात होता. अमित शहा बनास डेअरीच्या विविध प्रकल्पांचे आणि उत्पादनांचे लोकार्पण करणार होते आणि जनसभेला संबोधित करणार होते. (Amit Shah Sister Passes Away)

Amit Shah Elder Sister: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली

केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या भगिनी श्रीमती राजेश्वरीबेन शाह यांचे आज मुंबईत दुःखद निधन झाले. त्यांचे जाणे हे समस्त शाह कुटूंबियांसाठी अत्यंत धक्कादायक आहे. या दुःखात मी व्यक्तिशः सहभागी असून या धक्क्यातून सावरण्याचे बळ आदरणीय अमितभाई आणि समस्त शाह कुटूंबियांना मिळो हीच ईश्वराचरणी प्रार्थना. राजेश्वरीबेन शाह यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news