Amit Sana : ‘अभिजीतला जिंकवण्यासाठी माझी वोटिंग लाईन बंद’

Indian Idol 1 Amit Sana
Indian Idol 1 Amit Sana
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : रिअॅलिटी 'इंडियन आयडॉल १' ( २००४ ) शोमध्ये फायनलसाठी अंतिम स्पर्धक अमित साना ( Amit Sana ) आणि अभिजीत सावंत ही दोघेजण आमने -सामने होते. दोघांची फॅन फॉलोव्हिग खूपच मोठी होती. परंतु, शेवटी अभिजीतने 'इंडियन आयडॉल १' ची ट्रॉफी जिंकली आणि अमितला फर्स्ट रनरअपचा पुरस्कार देण्यात आला. आता जवळपास १९ वर्षांनंतर अमितने हा शो जिंकण्यासाठी जाणीवपूर्वक माझी वोटिंग लाईन बंद केली असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

संबंधित बातम्या 

अमित सानाने ( Amit Sana ) सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा करताना सांगितले की, 'अभिजीत सावंतला मुद्दाम हा शो जिंकण्यासाठी बोलविण्यात आले होते. त्याला 'इंडियन आयडॉल १' ची ट्रॉफी जिंकता यावी यासाठी माझी दोन दिवस अगोदर वोटिंग लाईन बंद करण्यात आली होती. त्यामुळे त्याला जिंकण्यास मदत झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. २००४ मध्ये मागे वळून पाहिल्यास इंडियन आयडॉलच्या पहिल्या सीझनची प्रेक्षकांमध्ये खूपच क्रेझ असल्याचे दिसत होती. अभिजीत आणि अमित सना यांच्यातील अंतिम लढतीतील चुरस अनुभवण्यास चाहत्यांना आनंद झाला होता.' असेही त्याने म्हटलं.

अभिजीतची मागितली माफी

याच मुलाखतीत अमितने १९ वर्षांनंतर ही माहिती समोर आणल्यामुळे अभिजीतची माफीदेखील मागितली आहे. दरम्यान अमितने अभिजीतबद्दल पुढे म्हणाला की, असे वागून अभिजीतला फक्त प्रसिद्धी मिळाली आणि लोक त्याला गंभीरपणे घेऊ लागले. तर दुसरीकडे अमितने शोमधील दुसरा स्पर्धक राहुल वैद्य याचीदेखील आठवण काढली आहे. तो या शोमध्ये दुसरा उपविजेता होता. याशिवाय अमितने राहुलसोबत शोमध्ये केलेली मौजमस्ती, भांडण, लढाई यांच्याबद्दलही चर्चा केली.

'इंडियन आयडॉल १' नंतर अमित साना आणखी एका रिअॅलिटी शो 'जो जीता वही सुपरस्टार' चा भाग बनला. मात्र तो पहिल्या आठवड्यांत यातून बाहेर पडला. यानंतर त्याने 'चल दिए' या गाण्याचा एक हिट व्हिडिओ तयार केला. 'कलयुग' आणि 'दिल्ली हाइट्स' सारख्या चित्रपटांतून त्याला बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news