Nitish Kumar : नितीशकुमारांच्या वक्तव्यावर अमेरिकन गायिका संतप्त

Nitish Kumar : नितीशकुमारांच्या वक्तव्यावर अमेरिकन गायिका संतप्त
Published on
Updated on

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विधानसभेत लैंगिक शिक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत माफी मागितली असली, तरी त्यांच्यावर अद्याप सर्वच क्षेत्रांतून टीका केली जात आहे. आता अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका मेरी मिलबेन यांनी गुरुवारी नितीशकुमार यांच्या वक्तव्यावर टीका केली असून, त्यांनी राजीनामा देण्याची वेळ आल्याचे म्हटले आहे. (Nitish Kumar)

मेरी म्हणाल्या की, मी जर भारतीय नागरिक असते, तर बिहारमधून नितीशकुमार यांच्या विरोधात निवडणूक लढवली असती. पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करत असून, ते भारत-अमेरिका संबंध आणि जागतिक आर्थिक स्थैर्यासाठी सर्वोत्तम काम करत आहेत. बिहारमध्ये महिलांच्या मूल्यांना आव्हान दिले आहे, मला वाटते की या आव्हानाला एकच उत्तर असू शकते.(Nitish Kumar)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news