अमेरिकन उच्चायुक्ताकडून पुणे वाहतूक पोलिसांचे आभार

अमेरिकन उच्चायुक्ताकडून पुणे वाहतूक पोलिसांचे आभार

पुणे :  पुढारी वृत्तसेवा : पुणे भेटीसाठी आलेल्या अमेरिकेच्या उच्चआयुक्त पॅट्रीसिया लॅसिना यांनी पुणे वाहतुक विभागचे कौतुक करत वाहतुक विभागाचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांना युएसए अ‍ॅम्बेसीचे नाणे देऊन आभार व्यक्त केले. लॅसिना या 16 ऑगस्ट ते 18 दरम्यान पुणे भेटीस आल्या होत्या. या कालवधीत त्यांनी पुणे विमानतळ येथून शिक्रापूर, येरवडा, हडपसर, मंगळवारपेठ, नगर असा दौरा केला.

उपायुक्त श्रीरामे यांच्या आदेशानुसार व्हीआयपी यांच्या येण्याजाण्याच्या मार्गावर वाहतुक पोलिसांचा योग्य बंदोबस्त नेमल्याने व वाहतूक व्यवस्था योग्यप्रकारे हाताळली गेली. शहरात मेट्रोची, रस्त्याची कामे सुरू असताना व्हीआयपींच्या कॉन्व्हायला अडथळा न पोहचता पाहुण्यांना वेळेत कार्यक्रमात पोहचता आले. तसेच आयोजीत कार्यक्रमही निर्विघ्नपणे पार पडले. त्यामुळे लॅसिना यांनी  श्रीरामे यांच्यासह वाहतुक शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले.

logo
Pudhari News
pudhari.news