व्हॉटस्अ‍ॅपमध्ये चॅटसाठी येणार ‘एआय’चे भन्नाट फिचर

व्हॉटस्अ‍ॅप चॅट
व्हॉटस्अ‍ॅप चॅट
Published on
Updated on

वॉशिंग्टन : सध्याचा जमाना हा 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' म्हणजेच 'एआय'चा आहे. त्याचा वापर अनेक ठिकाणी होत आहे व 'व्हॉटस्अ‍ॅप' ही त्याला अपवाद राहिलेले नाही. व्हॉटस्अ‍ॅप हे असे अ‍ॅप आहे की, जे बहुतांश लोकांच्या फोनमध्ये सहज दिसेल. भारतातच काय तर अगदी जगभरातील लोक हे अ‍ॅप वापरतात. व्हॉटस्अ‍ॅपही वापरकर्त्यांच्या सोईसाठी नवनवीन फिचर घेऊन येत असते. आता व्हॉटस्अ‍ॅप युजर्ससाठी ही आनंदाची बातमी आहे. मेटा कंपनी व्हॉटस्अ‍ॅपच्या युजर्ससाठी एआयचे एक खास फीचर घेऊन येत आहे. काय आहे हे फिचर जाणून घेऊ.

मेटा कंपनी एआयचे मॉडेल आता व्हॉटस्अ‍ॅप युजर्ससाठीही घेऊन येत आहे. मार्क झुकरबर्ग यांनी मेसेजिंग अ‍ॅप व्हॉटस्अ‍ॅप मेटा कनेक्ट 2023 कार्यक्रमादरम्यान घोषणा केली की, व्हॉटस्अ‍ॅपवर आम्ही आता 'एआय चॅटबॉट' हे फिचर घेऊन येत आहोत. चॅटबॉट सुरुवातीला युनायटेड स्टेटस्मधील युजर्ससाठी उपलब्ध होते. पण, आता अ‍ॅण्ड्रॉइड युजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅप बीटामध्ये लवकरच हे भन्नाट फिचर उपलब्ध करून दिले जाणार आहे. अ‍ॅण्ड्रॉईड व्हर्जनसाठी व्हॉटस्अ‍ॅपमध्ये एका वेगळा शॉर्टकट पाहायला मिळेल. युजरला नवीन चॅट सुरू करण्यासाठी एक वेगळा आयकॉन दिसेल. एआय चॅटबॉट हे चॅटस् विभागात दिसेल. तिथे नवीन चॅट हा (न्यू चॅट) आयकॉन दिसेल.

या आयकॉनच्या मदतीने एक नवीन शॉर्टकट तयार होईल आणि एआय चॅटमध्ये प्रवेश करणे सोपे जाईल. त्यामुळे व्हॉटस्अ‍ॅप युजर्सना या नवीन टूलबाबत सहज माहिती मिळेल आणि अगदी सहजपणे याचा उपयोग करता येईल. सहलीची प्लॅनिंग, व्हॉटस्अ‍ॅपसंबंधित प्रश्नांची उत्तरे, विशिष्ट कामाचे वेळापत्रक, ग्रुप चॅट, जोक्स आदी गोष्टींसाठी एआय चॅटबॉटचा वापर करू शकता. तसेच माहितीचा एक स्रोत म्हणून हे फीचर डिझाईन करण्यात आले आहे. नेमकी ही सुविधा कधी सुरू होईल ते कंपनीने अद्याप हे स्पष्ट केलेले नाही. जे लोक व्हॉटस्अ‍ॅपच्या बीटा प्रोग्रॅमचा भाग आहेत, ते सर्व या नव्या फिचरची टेस्टिंग करू शकतील.

आतापर्यंत हे फिचर सुरुवातीला व्हॉटस्अ‍ॅपच्या पब्लिक व्हर्जनमध्ये आलेले नाही, असे सांगण्यात येत आहे. मेटाचे एआय सहायक वापरकर्त्यांना इमॅजिन कमांडचा वापर करून वास्तववादी दिसणार्‍या प्रतिमा तयार करण्यास परवानगी देईल. तसेच हे सर्व विनामूल्य उपलब्ध आहे. कंपनीने सांगितले की, त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या बिंग चॅटसह एआय कोलॅबोरेट केले आहे. आता लवकरच व्हॉटस्अ‍ॅप युजर्ससाठी एआय चॅटबॉट हे फिचर घेऊन येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news