Amarnath Yatra 2023: ‘या’ कारणामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित

Amarnath Yatra 2024
Amarnath Yatra 2024

पुढारी ऑनलाईन: अमरनाथ यात्रेला शनिवार १ जुलैपासून सुरूवात झाली आहे. यात्रेला सुरूवात होऊन सात दिवस झाले आहेत. मात्र उत्तर भारतात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने वातावरणामध्ये बदल झाला आहे. दरम्यान हवेची दृश्यता कमी झाल्याने वातावरण खराब झाले आहे, त्यामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित (Amarnath Yatra 2023) करण्यात आली आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.

Amarnath Yatra 2023: काय आहे अमरनाथ यात्रेचे महात्म्य

गुहेत तयार होणार्‍या शिवलिंगाचे भाविकांना मोठे आकर्षण असते. या गुहेत शिवलिंगाबरोबरच दोन लहान बर्फाची पिंड तयार होते आणि त्यास पार्वती आणि श्री गणेश याचे प्रतीक मानले गेले आहे. गुहेच्या छताला असलेल्या एका भेगातून पडणार्‍या पाण्याच्या थेंबापासून शिवलिंग नैसर्गिक रूपाने तयार होते. अमरनाथ गुहेतील शिवलिंग हे चंद्राच्या प्रकाशाच्या आधारावर वाढते आणि कमी होते. अशा प्रकारचे जगातील एकमेव अद्वितीय शिवलिंग आहे. अमरनाथ यात्रेत भाविकांची वाढणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून व्यापक तयारी केली जात आहे. वास्तविक दरवर्षीच भाविकांच्या संख्येनुसार तयारी करण्यात येते. परंतु यावर्षी गृहमंत्री अमित शहा यांनी स्वत: तयारीचा आढावा घेतला आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news