गाढ झोपेमुळे ‘अल्झायमर’ पूर्ण बरा होऊ शकतो!

गाढ झोपेमुळे ‘अल्झायमर’ पूर्ण बरा होऊ शकतो!

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  'अल्झायमर' अर्थात स्मृतिभ्रंशाच्या आजाराचे प्रस्थ मोठ्या प्रमाणावर वाढीस लागले आहे. त्यामुळे निर्माण होत असलेल्या तणावाचा सामना करणार्‍या प्रौढ व्यक्तींंमधील स्मरणशक्ती कमी होण्यापासून रोखण्यासाठी गाढ झोप उपयुक्त ठरते; किंबहुना गाढ झोप घेतल्यामुळे हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो, असे नवीन संशोधनाने सूचित केले आहे.

गाढ झोप, ज्याला 'नॉन-रेम स्लो-वेव्ह स्लीप' म्हणूनही ओळखले जाते, ते एक कॉग्निटिव्ह रिझर्व्ह फॅक्टर म्हणून काम करू शकते, जे मेंदूतील बीटा-अ‍ॅमिलॉईड नावाच्या प्रथिनामुळे निर्माण होणारा स्मृतिभ्रंश टाळण्यास मदत करते. अस्वस्थ किंवा विस्कळीत झोपेमुळे मेंदूमध्ये बीटा-अ‍ॅमिलॉईड प्रोटिनचा संचय जलदपणे होत असतो. तथापि, नवीन संशोधनातून असे दिसून आले आहे की, जास्त प्रमाणात घेतलेली गाढ झोप अर्थात 'द-वेव्ह स्लीप' अल्झायमर हा आजार असलेल्या लोकांमधील स्मृती कमी होण्यापासून संरक्षणात्मक घटक म्हणून काम करते. तज्ज्ञांच्या मते, ही एक संभाव्य महत्त्वपूर्ण प्रगती आहे, ज्यामुळे काही घातक परिणाम दूर होऊ शकतात आणि पीडित व्यक्तीला जीवनाचा आनंद घेता येऊ शकतो.

बर्कलेच्या ह्युमन स्लीप सायन्स सेंटरच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातील पोस्टडॉक्टरल संशोधक सोफिया झवेक म्हणतात, मेंदूविषयी निगडित पॅथॉलॉजीच्या काही पातळ्या आहेत. एका विशिष्ट पातळीवर, तुम्हाला संज्ञानात्मक लक्षणे किंवा स्मरणशक्तीच्या समस्या येत नाहीत. लोकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, पॅथॉलॉजीची विशिष्ट पातळी असली, तरीही जीवनशैलीचे काही घटक परिणाम करीत असतात. त्यामुळेदेखील स्मृतिभ्रंशाचा परिणाम कमी किंवा मध्यम स्वरूपाचा होण्यास उपायकारक ठरतात आणि त्या घटकांपैकी एक म्हणजे झोप आणि विशेषतः गाढ झोप.

बीएमसी मेडिसीन जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले असून, अल्झायमर रोगावर उपचार शोधणे आणि त्याला पूर्णपणे प्रतिबंधित करण्याच्या उद्देशाने केलेल्या मोठ्या कार्यातील नवीनतम संशोधन आहे. डिमेंशियाचा सर्वात प्रचलित प्रकार म्हणून, अल्झायमर हा आजार स्मृती मार्ग नष्ट करतो आणि प्रगत स्वरूपात, मूलभूत दैनंदिन कार्ये करण्याच्या संबंधित व्यक्तीच्या क्षमतेमध्ये हस्तक्षेप करतो. 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नऊपैकी एका व्यक्तीला या आजाराने ग्रासले आहे. तथापि, पिढी दर पिढी या आजाराचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news