Pushpa 2 Teaser : स्वॅगमध्ये आला अल्लू अर्जुन, जत्रा लूक व्हायरल

Pushpa 2
Pushpa 2
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अल्लू अर्जुनच्या बहुप्रतीक्षित चित्रपट 'पुष्पा २' चा धमाकेदार टीजर रिलीज झाला आहे. यामध्ये पुष्पा राजच्या अवतारात अल्लू अर्जुनचा स्वॅग दिसत आहे. आज अल्लू अर्जुनच्या वाढदिवसादिवशी निर्मात्यांनी पुष्पा २ चा ग्रँड टीजर (Pushpa 2 Teaser) रिलीज केला आहे. आज सकाळी ११ वाजून ७ मिनिटांना टीजर रिलीजची घोषणा झाली होती. अल्लू अर्जुनने आपले वचन पूर्ण करत दमदार टीजर सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलं. टीजरमध्ये अल्लू अर्जुन साडी नेसलेली दिसतो. साडी नेसून तो गुंडांना मारताना दिसतो. अभिनेत्री रश्मिका मंदाना पुष्पा राजची पत्नी श्रीवल्लीच्या भूमिकेत वापसी करेल. (Pushpa 2 Teaser)

अल्लू अर्जुनने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून फॅन्सला म्हटले की, I thank each and everyone of you for the birthday wishes! My heart is full of gratitude. Please take this teaser as my way of saying thank you! ? #Pushpa2TheRule

रॉकस्टार डीएसपी ज्याने 'पुष्पा: द राइज' साठी देखील गाणी रचली होती, 'सामी सामी', 'ऊ अंतवा' आणि 'श्रीवल्ली' अश्या धमाकेदार गाण्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. 'पुष्पा 2: द रुल' जो या वर्षी १५ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे रॉकस्टार डीएसपीकडे काही फॅब प्रोजेक्ट येत आहेत. तो 'कंगुवा', 'RC १७', 'उस्ताद भगतसिंग', 'गुड बॅड अग्ली', 'कुबेरा', 'रथनम' आणि 'थंडेल' या चित्रपटांना संगीत देणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news