Pushpa 2 teaser: आला पुष्पा..गळ्यात लिंबूची माळ..अल्लूचा लूक अचंबित करणारा (Video)

Pushpa २ allu arjun
Pushpa २ allu arjun

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट 'पुष्पा २'चा टीजर रिलीज झाला. ॲक्शन पॅक्ड पॅन इंडिया हा चित्रपट यावर्षी रिलीज होणार आहे. याआधी फॅन्सना अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ च्या लूकची प्रतीक्षा होती. आता निर्मात्यांनी अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाला 'पुष्पा २' चा टीजर रिलीज केला आहे. अल्लू अर्जुनचा खूप अंचबित करणारा लूक टीजरमध्ये दिसत आहे.

टीजरची सुरुवात 'पुष्पा'ला शोधण्यापासून होते. जंगल, शहर, शेत, गल्ल्या सगळीकडे पोलिस 'पुष्पा'ला शोधताना दिसत आहेत आणि 'पुष्पा' गायब आहे. लोकांचा दूत पण पोलिसांसाठी एखाद्या गुन्हेगारापेक्षा कमी नाही. 'पुष्पा'चे चाहते पुष्पा नावाचा जयजयकार आणि पोलिसांविरोधात घोषणा देताना दिसताहेत. दुसरीकडे पोलिस लोकांवर लाठी चार्ज आणि पाणी फेकताना दिसत आहेत. सगळीकडे चौकशी होताना दिसतेय की, 'पुष्पा' कुठे आहे.

अल्लू अर्जुन पुन्हा एकदा चर्चेत आलाय. 'पुष्पाः द राईज' मध्ये त्याने आपल्या स्टाईल आणि डॅशिंग लूकने वाहव्वा मिळवलीय. आतादेखील पुष्पा २ च्या भागात पोस्टरवर 'पुष्पा'च्या गळ्यात लिंबूची माळा, हेवी ज्युलरी घातलेली दिसतो. बोटांमध्ये ढिगभर अंगठ्या, हातात बांगड्या आणि निळ्या रंगाची साडा – ब्रोकेड ब्लाऊज सोबत नाकात नथनी आणि निळा संपूर्ण शरीरावर लावलेला दिसत आहे. एका हातात रिवॉल्वर देखील दिसत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news