पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिलीय. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलिसांनी सुरू केला. सांताक्रूझ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या हवाल्याने ANI वृत्तसंस्थेने दिलीय.
सोशल मीडिया पर धमकी देण्याचा आरोप आदित्य राजपूत नावाच्या व्यक्तीवर आहे. पोलिस विक्की कौशल यांच्या तक्रारीनंतर आदित्यविषयी तपास सुरू आहे.
विक्की कौशलचा आरोप आहे की एका व्यक्तीने त्याला इन्स्टाग्रामवर मेसेजच्या माध्यमातून धमकी देत आहे. विक्कीने आरोप लावलं आहे की, कॅटरीना कैफवरदेखील नजर ठेवली आहे.
विक्की -कॅटरीनाने मागील वर्षी ९ डिसेंबर रोजी लग्न केले आहे.